Uddhav Thackeray : “डॉक्टरांनी आराम करायचा सल्ला दिला, पण मी त्यांना म्हटलं आधी…”, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य चर्चेत

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राजन तेली आणि दीपक साळुंखे यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षात प्रवेश केला.

What Uddhav Thackeray Said?
उद्धव ठाकरे यांनी काय म्हटलं आहे वाचा सविस्तर बातमी (फोटो-उद्धव ठाकरे फेसबुक पेज)

Uddhav Thackeray : राजन तेली आणि दीपक साळुंखे यांनी आज शिवसेना ( उद्धव ठाकरे ) पक्षात प्रवेश केला. यावेळी उपचार घेऊन परत आलेले उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांचं हे देखील मातोश्रीवर होते. त्यांच्या उपस्थितीत राजन तेली आणि दीपक साळुंखे यांनी हातावर शिवबंधन बांधलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातला हा महत्त्वाचा दिवस आहे असं संजय राऊत म्हणाले. ज्या गद्दाराला महाराष्ट्रातले झाडी आणि डोंगर दिसले नाहीत आता या झाडांच्या मुळाखाली आपल्याला त्याला गाडायचा आहे. असा टोला संजय राऊत यांनी यावेळी शहाजीबापू पाटील यांना लगावला आहे. गद्दाराला गाडण्यासाठी घराघरांत आपली मशाल पोहचवा असं आवाहन संजय राऊत यांनी केलं.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

आपल्या सर्वाचं मातोश्री आणि शिवसेनेत स्वागत करतो. दसऱ्यानंतर आज पहिल्यांदाच तुमच्यात आलो. मधल्या काळात हॉस्पिटलवारी करावी लागली. डॉक्टरांनी सांगितलं आराम करा, पण मी त्यांना म्हटलं आता हराम्यांना घालवायचं आहे. त्याशिवाय काही आराम नाही. आज कामाला सुरुवात केली आहे. आबांसारखा मजबूत माणूस शिवसेनेत सहभागी झाले आहेत. दीपक साळुंखेच्या हाती मशाल दिली आहे. मशाल कशी पेटवायची आणि कुणाला चटके द्यायचे ते तुम्ही ठरवायचं आहे. ही निवडणूक सोपी नाही. दीपक आबांचा विजय नक्की आहे. गद्दार खोके घेऊन बसले आहेत, धनुष्यबाण आणि मशाल असा संभ्रम ते निर्माण करतात. ही निशाणी तुम्हा सगळ्यांना घराघरांत पोहचवायची आहे. आपण कुणाची जाहीर केलेली नाही. पण दीपक आबांच्या हाती मशाल दिली आहे इतकंच सांगतो आहे. असं उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) म्हणाले.

हे पण वाचा- माजी आमदार राजन तेली यांचा भाजपा प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

सांगोलेकर माझ्या बरोबर आहेत हे गद्दाराला दाखवून द्या-उद्धव ठाकरे

सांगोल्याचा आमदार जरी गद्दार झाला तरीही सांगोलेकर माझ्या बरोबर आहेत हे दाखवून द्या. मी प्रचारालाही येईन आणि विजयाच्या मेळाव्यातही येईन असा शब्द उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) दिला. आज मातोश्रीवर राजन तेली आणि दीपक साळुंखे उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांना भेटले. उद्धव ठाकरेंनी दीपक साळुंखे यांच्या हाती मशाल देत आहोत असं जाहीर केलं. एक प्रकारे उद्धव ठाकरेंनी दीपक साळुंखेची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या नावावर फक्त अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होणं बाकी आहे. सांगोल्यातून शहाजी बापू पाटील आमदार आहेत. ते एकनाथ शिंदेंसह गेल्याने उद्धव ठाकरेंनी त्यांचा उल्लेख गद्दार असा केला आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Uddhav thackeray said this thing about his health also said sangola will win by deepak salunkhe scj

First published on: 18-10-2024 at 17:07 IST
Show comments