Premium

Lok Sabha Election Results : “इंडिया आघाडी सत्तास्थापनेचा दावा करणार”, उद्धव ठाकरे ठाम; म्हणाले, “उद्या मी दिल्लीला जाऊन…”

Uddhav Thackeray Lok Sabha Election Results : उद्धव ठाकरे म्हणाले, या निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होतंय की, देशातील सर्वसामान्य जनतेने त्यांची ताकद दाखवून दिली आहे.

Uddhav Tackeray
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली.

Maharashtra Lok Sabha Election Results : लोकसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. एकट्या भाजपाने बहुमत मिळवलेलं नसून त्यांना सत्तास्थापनेसाठी एनडीएतील मित्रपक्षांवर अवलंबून राहावं लागणार आहे. अशातच इंडिया आघाडीलाही २३० हून अधिक जागांवर आघाडी मिळाली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीदेखील देशातील इतर लहान पक्ष आणि एनडीएतील काही पक्षांना आपल्याबरोबर घेऊन सत्तास्थापनेचा दावा करू शकते, अशा प्रकारची वक्तव्ये इंडिया आघाडीतील नेत्यांनी केली होती. दरम्यान, आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील याबाबत ठाम भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, इंडिया आघाडीने देशात सत्तास्थापनेचा दावा केलाच पाहिजे. हे जुलूम करणारं सरकार उंबरठ्यावर असून त्यांना आपण हटवायला पाहिजे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उद्धव ठाकरे म्हणाले, या निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होतंय की, देशातील सर्वसामान्य जनतेने त्यांची ताकद दाखवून दिली आहे. त्याबद्दल मी देशातील जनतेचं अभिनंदन करतो. सत्ताधारी लोक मस्तवाल झाले तर आपण त्यांना हरवू शकतो, एका बोटाच्या सहाय्याने त्यांना सत्तेतून हटवू शकतो, त्यांचा उधळलेला वारू रोखू शकतो आणि जनतेने तेच केलं आहे. त्याबद्दल मला जनतेचा अभिमान आहे.

उद्धव ठाकरे यांना यावेळी प्रश्न विचारण्यात आला की, इंडिया आघाडी देशात सत्तास्थानेचा दावा करणार का? यावर उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही सत्तास्थापनेसाठी दावा करायलाच पाहिजे. उद्या इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. मी दुपारनंतर त्या बैठकीला जाणार आहे. राज्यातले आमचे खासदार सकाळी मला भेटायला येणार आहेत. त्यांची भेट झाल्यानंतर मी दुपारी दिल्लीला जाईन. खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई यावेळी माझ्याबरोबर असतील. मी संध्याकाळी इंडियाच्या बैठकीत जाऊन या विषयावर बोलेन.

हे ही वाचा >> Uttar Pradesh Lok Sabha Election Result 2024 Live : उत्तर प्रदेश भाजपाच्या हातून निसटलं? देशातल्या सर्वात मोठ्या राज्याची स्थिती काय?

यावेळी उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला की इंडिया आघाडी सत्तास्थापनेचा दावा करणार असेल तर तुमचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? यावर उद्धव ठाकरे म्हणाले, उद्या आमची बैठक होणार आहे. आघाडी म्हणून आम्ही त्यावर चर्चा करू. आम्ही आघाडी तयार केली तेव्हा आमचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल याबाबत ठरलं नव्हतं. आमच्यापैकी कोणताही नेता सत्तेसाठी आघाडीत आला नव्हता. आमच्यापैकी कोणाचीही तशी इच्छा नाही. देशाचं संविधान वाचवणे, हुकूमशाहाला रोखण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. मात्र उद्याच्या बैठकीत आमचा नेता ठरेल.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Uddhav thackeray says india alliance will claim to form governmet lok sabha eection 2024 results asc

First published on: 04-06-2024 at 20:16 IST