Maharashtra Lok Sabha Election Results : लोकसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले असून भाजपाला बहुमत मिळालेलं नाही. देशात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाला तेलुगू देशम पार्टी, संयुक्त जनता दलासह एनडीएतील इतर मित्रपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. एनडीएने २९० जागांवर आघाडी मिळवली असली तर इंडिया आघाडीनेदेखील २३५ जागांवर आघाडी घेतली आहे. परिणामी भाजपाच्या चिंता वाढल्या आहेत. अशातच इंडिया आघाडीतील नेत्यांनी एनडीएतील पक्षांना त्यांच्याबरोबर घेण्याचे प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे. यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, “इंडिया आघाडीने देशात सत्तास्थापनेचा दावा करायला हवा. हे जुलूम करणारं सरकार पडण्याच्या उंबरठ्यावर असून त्यांना आपण हटवायला हवं.”

दादर येथील शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, इंडिया आघाडी टीडीपी, जेडीयू या पक्षांशी संपर्क साधणार का? यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “जे लोक भाजपामुळे त्रस्त आहेत ते आमच्याबरोबर येतील. सर्व देशभक्त इंडिया आघाडीबरोबर येणार. भाजपाने टीडीपीचे प्रमुख ए. चंद्राबाबू नायडू यांना खूप त्रास दिला आहे. तसेच इतर पक्षांनाही या लोकांनी खूप त्रास दिला आहे. ते लोकही आमच्याबरोबर येतील. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी आमच्याबरोबर आहेत, भाजपाने त्यांनाही खूप छळलंय. जे जे लोक भाजपाला कंटाळलेत, भाजपावर संतापलेत ते लोक आमच्याबरोबर येतील.”

Image Of MVA Leaders
MVA : “महाविकास आघाडी उद्ध्वस्त होतेय, जनतेने त्यांना हाकलून दिले”, ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा; अजित पवार गटाचा टोला
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Supriya Sule
Supriya Sule : महापालिका निवडणुकीबाबतच्या ठाकरे गटाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंचं रोखठोक मत; म्हणाल्या, “या निवडणुका…”
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
Uddhav Thackeray and Jitendra Awhad
Jitendra Awhad : “शेवटी कोणालातरी…”, पालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया!
Sanjay Raut On Municipal Corporation election
Sanjay Raut : मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार? संजय राऊतांचं मोठं भाष्य; म्हणाले, “दिल्लीत जे घडलं तेच…”
Chandrashekhar Bawankule Answer to Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “उद्धव ठाकरे अतिविलासी, मातोश्री २ च्या…”, मोदींवर टीका केल्यानंतर भाजपाचं उत्तर
उद्धव ठाकरे आणि भाजपा पुन्हा एकत्र येणार? महाराष्ट्रात अशा चर्चा का सुरू झाल्या? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : उद्धव ठाकरे भाजपासोबत जाणार? सामनातील अग्रलेखामुळे चर्चा कशासाठी?

उद्धव ठाकरे म्हणाले, “एखादा राजकीय पक्ष त्यांच्या विरोधकांना इतका त्रास कसा काय देऊ शकतो? लोकशाहीत, राजकारणात विरोधक असतातच. परंतु, हा विरोध जीवघेणा असता कामा नये. कुठेही सूडाचं राजकारण होता कामा नये. त्यामुळे भाजपाला त्रासलेले देशभक्त इंडिया आघाडीत येतील. आम्ही इतर पक्षांशी बोलणार आहोत. माझं ममता बॅनर्जी यांच्याशी बोलणं झालं आहे. आम्ही सर्वजण एकत्र होतो आणि पुढेही एकत्र राहू”

हे ही वाचा >> Uttar Pradesh Lok Sabha Election Result 2024 Live : उत्तर प्रदेश भाजपाच्या हातून निसटलं? देशातल्या सर्वात मोठ्या राज्याची स्थिती काय?

उद्धव ठाकरे म्हणाले, “या निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झालं आहे की, देशातील सर्वसामान्य जनतेने त्यांची ताकद दाखवून दिली आहे. त्याबद्दल मी देशातील जनतेचं अभिनंदन करतो. सत्ताधारी लोक मस्तवाल झाले तर आपण त्यांना हरवू शकतो, एका बोटाच्या सहाय्याने त्यांना सत्तेतून हद्दपार करू शकतो, त्यांचा उधळलेला वारू रोखू शकतो आणि सर्वसामान्य जनतेने तेच केलं आहे. त्याबद्दल मला आपल्या जनतेचा अभिमान आहे.”

Story img Loader