Shivsena : महाराष्ट्रात महायुती २३९ जागा मिळवत यशस्वी झाली आहे. आजवर इतक्या मोठ्या प्रमाणावर कुठल्याही आघाडी किंवा युतीला इतकं मोठं यश मिळालं नव्हतं जे या निवडणुकीत मिळालं आहे. विरोधक निकालात गडबड असल्याचा आरोप करत आहेत. मात्र जे वास्तव आहे ते निकालांमधून समोर आलं आहे. एवढंच नाही तर मुख्यमंत्री कोण होणार? याच्याही चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ( Shivsena ) आमदार आमच्या संपर्कात आहेत असा मोठा दावा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील एका नेत्याने केला आहे.
उदय सामंत यांनी नेमकं काय म्हटलं आहे?
कोकणात आम्ही १५ पैकी १४ जागा जिंकल्या आहेत. मी आणि माझे बंधू आम्ही दोघंही विधानसभेत आमदार असणार आहोत. त्याचप्रमाणे नितेश राणे आणि निलेश राणे हे दोन भाऊही विधानसभेत असणार आहेत. कोकणाचा विकास करणं ही आमची प्राथमिकता आहे असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर कोकण हा बालेकिल्ला चालतो, लोकांनीही तेच दाखवून दिलं आहे. फक्त गद्दार गद्दार असे आरोप करुन काही चालत नाही कामही करावं लागतं. विरोधकांची परिस्थिती अशी आहे की गिरे तो भी टांग उपर. उद्धव ठाकरे आणि त्यांचे काही नेते ईव्हीएममध्ये गडबड असल्याचं सांगत आहेत यापेक्षा मोठा जोक नाही. कारण जेव्हा तुमचा खासदार निवडून आला तेव्हा ईव्हीएममध्ये गडबड नव्हती का? आम्ही सगळे निवडून आल्याने लगेच ईव्हीएममध्ये गडबड झाली का? असे खोचक प्रश्न उदय सामंत यांनी विचारले आहेत. उरल्यासुरल्या लोकांना ताकद देण्याची ही धडपड आहे. जे स्वतःचा विरोधी पक्षनेता ( Shivsena ) निवडू शकत नाहीत इतकं ज्यांना जनतेने नाकारलं आहे त्यांनी आम्हाला सारखे सारखे सल्ले देऊ नये. उलट आत्मचिंतन करावं असंही उदय सामंत म्हणाले आहेत. साम मराठीला दिलेल्या मुलाखतीत उदय सामंत यांनी हे वक्तव्य केलं आहे.
हे पण वाचा- शिवसेनेतील सर्वांत यशस्वी बंडखोर… एकनाथ शिंदेंनी सव्वादोन वर्षांत कशी प्रस्थापित केली स्वतःची खणखणीत ओळख?
दोन ते तीन जणांचा अपवाद वगळता सगळे संपर्कात-उदय सामंत
निकालानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले ( Shivsena ) आमदारही आमच्या संपर्कात आहेत. दोन ते तीन आमदारांचा अपवाद वगळता इतर आमच्या संपर्कात आहेत. २० आमदार तुमचे जे काही आले आहेत त्याचा आनंद माना. पण दोघा-तिघांचा अपवाद वगळता सगळेच्या सगळे आमदार आमच्याबरोबर येण्याच्या मार्गावर आहेत. मी नेमकी संख्या सांगणार नाही पण एकनाथ शिंदेंच्या संपर्कात काही आमदार आले आहेत. संपूर्ण महाराष्ट्राने शिवसेना ( Shivsena ) कुणाची आहे ते दाखवून दिलं आहे.
आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे-उदय सामंत
आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे. ५७ आमदार आणि पुरस्कृत आमदार असे मिळून आम्ही ६१ जागा जिंकल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसच्या खांद्यावरुन शिवसेनेचा धनुष्यबाण काढून आणला. बाळासाहेब ठाकरेंचा वारसा पुढे नेणारे एकनाथ शिंदे आहेत हे महाराष्ट्राने दाखवून दिलं आहे, असंही उदय सामंत यांनी म्हटलं आहे.