उल्हासनगर: उल्हासनगरात शिवसेना-भाजपात अखेर समेट झाली आहे काही दिवसांपूर्वी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर शिवसेना आणि भाजपातील तणाव वाढला होता. शिवसेनेने भाजप आमदार कुमार आयलानी यांचा प्रचार करण्यास नकार दिला होता. अखेर शिवसेना-भाजप महायुतीची नुकतीच बैठक पार पडली. त्यात वादाचे मुद्दे दूर करण्यात आले. त्यामुळे आता शिवसेना-भाजप एकत्रित प्रचार करताना दिसणार आहे.

उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार कुमार आयलानी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यंदा त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) पक्षाच्या ओमी कलानी यांचे आव्हान आहे. सुरुवातीपासूनच कुमार आयलानी प्रचारात मागे पडले होते. आयलानी यांना भाजपने तिकीटही उशिराने दिले. त्यात भाजपातील पक्षांतर्गत वादाचा फटका आयलानी यांना बसला. त्यावर मात करत आयलानी यांनी तिकीट मिळवले. त्यानंतर उल्हासनगरातील काही प्रभागात वर्चस्व असलेल्या जीवन इदनानी यांच्या साई पक्षाने भाजपला पाठिंबा दिला. या घोषणेवेळी भाषण करताना भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते.

MNS President Raj Thackeray clear statement regarding Shiv Sena party symbols print politics news
शिवसेना, धनुष्यबाण ही शिवसेनाप्रमुखांची मालमत्ता; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची स्पष्टोक्ती
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Loksatta lalkilla Assembly elections in Maharashtra BJP campaign
लालकिल्ला: भाजपचा प्रचार करणार कोण?
maha vikas aghadi face rebels Challenges in yavatmal district
बंडखोर नामांकन परत घेण्याची महाविकास आघाडीला अपेक्षा; पुसदमध्ये ययाती नाईक माघार घेणार?
Vidhan Sabha election 2024, Arvi Constituency,
बंडखोरी शमवण्यासाठी भाजपकडून प्रथमच चार्टर्ड विमानाचा वापर, आर्वीत विद्यमान आमदार घेणार माघार
Maharashtra Assembly Election rebels from all party
सर्वपक्षीय बंडखोरांचा सुळसुळाट; भाजपाला सर्वाधिक फटका, मविआ-महायुतीची रणनीती काय?
satej patil on congress mla jayshri jadhav
जयश्री जाधव यांचे काँग्रेस सोडणे अशोभनीय – सतेज पाटील
Jalgaon City Constituency Assembly Election 2024 Rebellion to MVA Mahayuti in Jalgaon district due to non candidacy
जळगाव जिल्ह्यात मविआ, महायुतीला बंडखोरीचा फटका

हेही वाचा >>> कल्याण पूर्वेतील बंडखोर शहरप्रमुख महेश गायकवाड; यांच्यासह नऊ जणांची शिवसेनेतून हकालपट्टी

राजकारणात जो गद्दारी करतो तो मुख्यमंत्री होतो अशी राजकारणाची व्याख्या आता बदलली आहे, असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने रामचंदानी वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यानंतर झालेल्या महायुतीच्या मेळाव्यावर शिवसेनेने बहिष्कार टाकला होता. यात मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. तर रामचंदानी यांनीही दिलगिरी व्यक्त केल्यानंतर शिवसैनिकांनी माघार घेतली. नुकतीच शिवसेना-भाजप महायुतीची संयुक्त बैठक उल्हासनगरत पार पडली. या बैठकीनंतर शिवसेनेचे गोपाळ लांडगे यांनी महायुतीला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील निवडणुकांमध्ये लढणार असल्याने उल्हासनगर विधानसभेत कुमार आयलानी यांचे काम करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे उल्हास नगरातील शिवसेना भाजपातील वाद मिटल्यास ची चर्चा आहे.

वक्तव्यानंतर खुर्चीवरून शाब्दिक चकमक शिवसेना-भाजप समेट होत असताना त्यावेळी वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपचे प्रदीप रामचंदानीही उपस्थित होते. यावेळी माध्यमांसमोर बसताना खुर्चीवरून रामचंदानी आणि माकी जिल्हाध्यक्ष जमनादास पूरस्वानी यांच्यात खटका उडाला. बसण्याच्या खुर्चीवरून हा वाद झाला. यावेळी उपस्थित त्यांनी रामचंदानी यांना शांत केले. मात्र तोपर्यंत हा प्रकार माध्यम प्रतिनिधींच्या कॅमेरात कैद झाला होता.