Amit Shah Reaction on Delhi Election Result 2025 : गेल्या १० वर्षांपासून राजधानी दिल्लीत सत्तेवर असलेल्या आम आदमी पक्षाचा २०२५ च्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. तर, गेल्या २७ वर्षांपासून दिल्लीच्या सत्तेपासून लांब राहिलेल्या भारतीय जनता पक्षाचा दणदणीत विजय झाला आहे. यावर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं आहे. तर दिल्लीकरांचे आभार मानले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, “दिल्लीकरांच्या मनात मोदी. दिल्लीच्या जनतेने खोटेपणा, धोकेबाज आणि भ्रष्टाचाराच्या शीश महलाला नेस्तनाबूत करून दिल्लीला आप-दा मुक्त करण्याचं कार्य केलं आहे. दिल्लीकरांनी फसवणूक करणाऱ्यांना धडा शिकवला. यामुळे दिल्लीत विकास आणि विश्वासाचं एक नवं युग सुरू होणार आहे.”

ते पुढे म्हणाले, “दिल्लीत खोट्या शासनाचा अंत झाला. येथे अहंकार आणि अराजकतेचा पराभव झाला. येथे मोदी की गॅरंटी आणि मोदींच्या विकासाच्या व्हिजनवर दिल्लीकर विजयी झाले आहेत. या प्रचंड जनादेशासाठी दिल्लीच्या जनतेचे मनापासून आभार. मोदींच्या नेतृत्त्वातील भाजपाने आपले सर्व आश्वासने पूर्ण करून दिल्लीला जगातील एक नंबर राजधानी बनवण्याचा संकल्प ठेवला आहे.”

“दिल्लीकरांनी दाखवून दिलं की जनतेला सातत्याने खोटी आश्वासने देऊन फसवलं जाऊ शकत नाही. जनतेने आपल्या मतांनी दुर्गंधी यमुना, पिण्यासाठी अस्वच्छ पाणी, खराब रस्ते, प्रत्येक रस्त्यांवर दुकानांच्या दुकानांना उत्तर दिलं आहे. महिलांचा सन्मान असो, अनधिकृत कॉलनीवासियांचा स्वाभिमान असो, नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात दिल्ली एक आदर्श राजधानी बनेल”, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.