Premium

केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचा १ लाखांच्या मतांनी पराभव; काँग्रेसचे किशोरी लाल शर्मा विजयी

अमेठी मतदरासंघातून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभा निवडणूक लढवली. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे किशोरी लाल शर्मा हे निवडणुकीच्या मैदानात होते.

Smriti Irani Amethi Result
स्मृती इराणींचा पराभव, (फोटो-लोकसत्ता टीम)

लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. काही ठिकाणचे निकाल थोड्या वेळात समोर येणार आहेत. सध्या देशात इंडिया आघाडी २३५ जागांवर आघाडीवर आहे. तर भारतीय जनता पार्टी २९० जागांवर आघाडीवर आहे. पुढच्या काही वेळात सर्व निकाल स्पष्ट होतील. मात्र, भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना पराभवाला सामोर जावं लागलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेठी मतदरासंघातून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभा निवडणूक लढवली. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे किशोरी लाल शर्मा हे निवडणुकीच्या मैदानात होते. आज लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर पहिल्या फेरीपासूनच स्मृती इराणी या पिछाडीवर होत्या तर काँग्रेसचे किशोरी लाल शर्मा हे आघाडीवर होते. अमेठीतून स्मृती इराणींचा पराभव झाला असून स्मृती इराणी यांच्या विजयाची हॅट्रिक किशोरी लाल शर्मांनी रोखली आहे.

हेही वाचा : बारामतीत अजित पवार गटाला धक्का; सुप्रिया सुळे यांचा एक लाख मतांनी दणदणीत विजय

काँग्रेसचे किशोरी लाल शर्मांनी यांनी स्मृती इराणी यांचा तब्बल १ लाख १८ हजार ४७१ मतांनी पराभव केला आहे. स्मृती इराणी यांनी २०१४ मध्ये पहिल्यांदा अमेठी मतदरासंघातून निवडणूक लढवली होती. त्यानंतर २०१९ मध्ये स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा अमेठी मतदारसंघातून पराभव केला होता. मात्र, यावेळी राहुल गांधी यांनी रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवली. राहुल गांधी यांनी रायबरेली मधून तब्बल ४ लाख मतांनी विजयी झाले आहेत. राहुल गांधी यांनी रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवल्यामुळे अमेठी मतदारसंघातून काँग्रेसचे किशोरी लाल शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली होती. किशोरी लाल शर्मा यांनीच स्मृती इराणींच्या विजयाची हॅट्रिक रोखली आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Union minister smriti irani wins kishori lal sharma wins lok sabha election result 2024 gkt

First published on: 04-06-2024 at 16:39 IST
Show comments