Premium

UP Elections 2022 : उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईला काँग्रेसची उमेदवारी, प्रियांका गांधींनी केली घोषणा!

उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली असून त्यात ४० टक्क महिला उमेदवार तर ४० टक्के तरुणांचा समावेश आहे.

congress candidate list for up election unnao rape case
उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर!

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसनं आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. काँग्रेसच्या उमेदवार यादीकडे सगळ्यांचच लक्ष होतं. कारण यावेळी एकूण उमेदवारांपैकी ४० टक्के उमेदवारी ही महिलांना देण्याचं वचन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी दिलं होतं. त्यानुसार काँग्रेस पक्षानं निवडणुकांसाठी पहिली १२५ उमेदवारांची यादी जाहीर केली असून दिलेल्या आश्वासनानुसार यातल्या ५० मतदारसंघात महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. या यादीमध्ये उन्नाओ बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या आईला देखील उमेदवारी देण्यात आल्यामुळे त्याविषयी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

२०१७मध्ये उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये घडलेल्या बलात्कार प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली होती. कारण एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात भाजपाचा तत्कालीन आमदार कुलदीप सेनगर याचं नाव समोर आलं होतं. या प्रकरणी दीर्घकालीन खटला चालल्यानंतर कुलदीप सेनगरला १० वर्षांचा कारावास आणि १० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सेनगरला भाजपानं पक्षातून देखील आधीच निलंबित केलं आहे.

पोलिसांनी गैरवर्तन केलेल्या आशा कार्यकर्तीलाही उमेदवारी!

दरम्यान, आता काँग्रेसच्या उमेदवार यादीमुळे पुन्हा एकदा या प्रकरणाविषयी चर्चा सुरू झाली आहे. पीडितेची आई आशा सिंह यांचा काँग्रेसच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणावरून काँग्रेस पक्ष भाजपाला आगामी निवडणुकांमध्ये लक्ष्य करण्याची शक्यता आहे. आशा सिंह यांच्यासोबतच पूनम पांडे नामक आशा कार्यकर्तीला देखील उमेदवारी देण्यात आली आहे. नोव्हेंबर २०२०मध्ये शाहजगानपूरमध्ये योगी आदित्यनाथ यांना भेटण्याच्या प्रयत्नात असलेल्या पूनम पांडे यांच्याशी उत्तर प्रदेश पोलिसांनी गैरवर्तन केलं होतं. यावरूनही बराच वाद झाला होता.

“आज जाहीर करण्यात आलेल्या एकूण १२५ उमेदवारांपैकी ४० टक्के महिला असून ४० टक्के तरुण आहेत. या ऐतिहासिक धोरणाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशात नव्या पद्धतीचं राजकीय वातावरण निर्माण होईल अशी आम्हाला आशा आहे”, अशी प्रतिक्रिया प्रियांका गांधी यांनी यावेळी दिली.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Unnao rape victim mother congress candidate priyanka gandhi announces up election 2022 pmw

First published on: 13-01-2022 at 12:59 IST