Premium

UP Assembly Election 2022 : सत्तेचा मार्ग ‘बसप’च्या कुंपणातून ?

‘२०१७ वा २०१९ मध्ये भाजपच्या बाजूने लाट होती, आता ती नसल्यामुळे भाजपला एकतर्फी विजय मिळणार नाही.

(प्रातिनिधिक छायाचित्र)
(प्रातिनिधिक छायाचित्र)

उत्तर प्रदेश- ६

महेश सरलष्कर, लोकसत्ता

Tiroda Constituency, Vijay Rahangdale,
तिरोड्यात पुन्हा कमळ फुलणार, की तुतारी वाजणार?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra vidhan sabha election 2024 ajit pawar vs yugendra pawar baramati assembly constituency
बारामतीत अटीतटीचा सामना अजित पवार की युगेंद्र… मतदारांमध्ये संभ्रम; शरद पवार यांच्या सभेची चर्चा
maharashtra vidhan sabha election 2024 sanjay kelkar avinash jadhav rajan vichare thane assembly constituency
लक्षवेधी लढत : ‘शिवसेना- ठाणे’ समीकरण अडचणीत?
158 parties in the 2086 independent candidate contest maharashtra assembly election 2024
१५८ पक्ष, २०८६ अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात
Jharkhand Assembly Election 2024 Phase 1 Voting Updates in Marathi
Jharkhand Assembly Election 2024 : झारखंडमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत ५९ टक्के मतदान
murbad constituency kisan kathore subhash pawar, agri and kunbi
मुरबाडच्या ‘कुणबी’ लढतीत आगरी अस्मिताही महत्वाची

गोरखपूर : ‘ना भाजपला बहुमत मिळेल ना समाजवादी पक्षाला. दोन्ही पक्षांना १७०-१८० जागा मिळतील. मग, बसपच्या मदतीने भाजप सत्ता राखेल’, असा दावा कुशीनगरचे रहिवासी आणि भाजपचे मतदार जगदीश तिवारी यांनी केला.. ‘तुमचा पाठिंबा आम्हाला चालेल, ते सपवाले नको,’ असे गोरखपूर विद्यापीठात भाजपसमर्थक कर्मचारी ‘बसप’समर्थक सहकाऱ्याला गमतीने सांगत होता.. ‘मायावतींनी पािठबा दिला नाही तर बहुजन समाज पक्षाचे आमदार फोडून भाजप सरकार स्थापन करेल,’ असे मऊमधील रहिवाशांचे म्हणणे होते.. अशा अनेक प्रतिक्रिया ‘बसप’च्या सर्वेसर्वा मायावती यांचे उत्तर प्रदेशाच्या राजकारणातील महत्त्व स्पष्ट करत होत्या.

‘२०१७ वा २०१९ मध्ये भाजपच्या बाजूने लाट होती, आता ती नसल्यामुळे भाजपला एकतर्फी विजय मिळणार नाही. त्यामुळे भाजप-सप यांच्यात रस्सीखेच सुरू आहे,’ असे पिपराईच गावातील दुग्ध व्यावसायिक जगदीश पासवान यांचे म्हणणे होते. भाजपची घोडदौड ‘सप’ने अडवली असल्याचे लोकांना वाटू लागले आहे; पण अखिलेश यादव यांना सत्ता मिळायची असेल तर, समाजवादी पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले पाहिजे. नाही तर भाजप कोणत्याही मार्गाने सत्ता टिकवेल. त्रिशंकू विधानसभा निर्माण झाली तर भाजपसाठी सत्तेचा मार्ग कुंपणावर बसलेल्या ‘बसप’च्या सर्वेसर्वा मायावती यांच्या पािठब्यावर अवलंबून असेल, असे मानले जात आहे.      

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मायावती सक्रिय झाल्या नाहीत. त्यांनी ‘बसप’च्या चिन्हावर उमेदवार उभे केले; पण त्यांच्यासाठी मायावतींनी प्रचारदौरे केले नाहीत. त्यामुळे ‘बसप’ला मिळणाऱ्या जागा उमेदवारांनी वैयक्तिक ताकदीवर खेचून आणलेल्या असतील. २०१२ मध्ये ‘सप’ने २२४ जागा जिंकून सत्ता मिळाली होती, तेव्हा ‘बसप’ला ८० जागा मिळाल्या होत्या. २०१७ मध्ये भाजपच्या (३१२ जागा) झंझावातात ‘बसप’ला १९, तर ‘सप’ला ४७ जागा मिळाल्या होत्या. गेल्या वेळी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही ‘बसप’ने किमान जागा मिळवल्या असल्यामुळे यंदा ‘बसप’च्या जागांमध्ये वाढ होऊ शकते, असे मानले जात आहे. ‘बसप’ला २५ ते ७५ जागा मिळू शकतात, असा गोरखपूर विद्यापीठातील मायावती समर्थकांचा दावा होता.

दलितांमधील तरुणांना ‘भीम आर्मी’चे प्रमुख चंद्रशेखर आझाद (रावण) यांचे आकर्षण आहे. मायावती सत्तेशी जुळवून घेतात, आझाद सत्तेला आव्हान देतात, असे या तरुणांना वाटते. ‘१८ ते २५ वयोगटातील दलित तरुण आझादांकडे जाईल, पण मध्यमवयीन दलित मतदार ‘बसप’ला मत देईल. पारंपरिक मतदार मायावतींपासून दूर गेलेला नाही’, असे विश्लेषण भाजपचे खासदार शिवप्रताप शुक्ला यांनी केले. गोरखपूरमध्ये चंद्रशेखर आझाद हे योगींविरोधात लढत असल्याने राप्ती नगरमधील अंकुर अतिथी भवनात ‘भीम आर्मी’च्या कार्यकर्त्यांची वर्दळ होती. गोरखपूर-शहर मतदारसंघातून ‘बसप’चा उमेदवार लढत असला तरी, हे तरुण चंद्रशेखर आझाद यांच्या प्रचारात सहभागी होण्यासाठी आले होते. ‘मायावतींचे राजकारण बचावात्मक असते; पण मध्यमवयीन जाटव मतदारांच्या भरवशावर ‘बसप’ला काही न करता जागा मिळू शकतात. 

..तर मायावतीही मुख्यमंत्री

सत्तेच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणता येते, या विचारातून मायावतींनी राजकारण केले. त्यामुळे मायावतींनी सत्तेसाठी भाजपला पाठिंबा दिला तर चूक नव्हे. बसपला किती जागा मिळतात, यावर मायावतींची सत्ता मिळवण्याची ताकद ठरेल. समजा, बसपला ७५ जागा मिळाल्या तर, मायावती मुख्यमंत्रीही होऊ शकतात, असा आशावाद गौतम यांनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Up assembly election 2022 bsp to play important role in government formation zws

First published on: 03-03-2022 at 00:06 IST

संबंधित बातम्या