उत्तर प्रदेश- ४
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
महेश सरलष्कर, गोरखपूर
‘‘आमचा विरोध भाजपला नाही, योगींना आहे. मुख्यमंत्री झाल्यापासून योगींनी उत्तर प्रदेशमधील ब्राह्मणांची राजकीय गळचेपी केली आहे’’, असे कोणताही आडपडदा न ठेवता लल्लन दुबे यांनी सांगितले.
दुबे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय. ब्राह्मण समाजातील अंतर्गत घडामोडींची त्यांना खडान् खडा माहिती असते. सार्वजनिक बांधकाम क्षेत्रातील कंत्राटातून त्यांचे अर्थार्जन होते. ‘‘ योगींनी सरकारी कंत्राट वाटपातून ब्राह्मणांना खडय़ासारखे बाजूला केले आहे. ब्राह्मणांची योगींनी आर्थिक नाकाबंदी देखील केली आहे’’, असे दुबेंचे म्हणणे होते.
उत्तर प्रदेशच्या राजकारणात आणि सर्व पक्षांच्या सरकारमध्ये ८० च्या दशकापासून दबदबा असलेले ब्राह्मणांमधील बाहुबली नेते हरिशंकर तिवारी यांचे राजकारण दुबेंनी अगदी जवळून पाहिले आहे. हरिशंकर यांचे पुत्र विनय तिवारी चिल्लूपार विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे उमेदवार आहेत. २०१७ मध्ये त्यांनी ‘बसप’मधून विजय मिळवला होता. यावेळी तिवारींच्या उमेदवारीतून ‘सप’चे प्रमुख अखिलेश यादव यांनी राज्यातील तमाम नाराज ब्राह्मणांना ‘संदेश’ दिल्याचे मानले जाते. बडहलगंज गावात रविवारी झालेल्या अखिलेश यांच्या प्रचार सभेच्या आयोजनासाठी दुबे इथे ठाम मांडून होते. ‘‘अखिलेश असो वा मायावती, त्यांचे राजकीय सल्लागार ब्राह्मण आहेत. इथे जाटवांनंतर ब्राह्मण मतदार सर्वाधिक आहेत. पक्ष कोणताही असो, उत्तर प्रदेशमध्ये ब्राह्मणांशिवाय सरकार बनू शकत नाही’’, असा दावा लल्लन दुबेंनी केला. उत्तर प्रदेशमधील लोकसंख्येत ब्राह्मण १० टक्के आहेत.
योगींना आधी मथुरेतून, नंतर अयोध्येतून निवडणूक लढवायची होती, त्यासाठी दोन्ही ठिकाणी योगींनी अंतर्गत सव्र्हेक्षण करून अंदाज घेतलेला होता, पण, ‘सुरक्षित’ मतदारसंघ म्हणून अखेर ‘गोरखपूर-शहर’ची निवड केली, असे दुबेंचे म्हणणे. मथुरा आणि अयोध्येतील ब्राह्मण मतदारांनी योगींविरोधात मतदान केले असते, असे दुबेंच्या विधानातून ध्वनित होत होते.
भाजपचे राज्यसभेतील खासदार आणि अनुभवी ब्राह्मण नेते शिवप्रताप शुक्ला यांनी योगींचे समर्थन केले. ‘‘योगी अयोध्येतून लढणार नव्हते, तिथल्या विद्यमान आमदाराची उमेदवारी कशाला काढून घ्यायची? इथे गोरखनाथाचे मंदिर लोकांचे श्रद्धास्थान आहे, योगी मठाधिपती आहेत, ते गोरखपूरमधून नाही तर कुठून लढणार’’, असा प्रतिप्रश्न शुक्ला यांनी केला.
अयोध्येत वेदप्रकाश गुप्तांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली. राज्यभरातील नाराज ब्राह्मणांची मनधरणी करण्यासाठी भाजपने नेमलेल्या समितीत खासदार शिवप्रताप शुक्ला यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती. ‘‘ब्राह्मण मते निर्णायक ठरणाऱ्या मतदारसंघात भाजपविरोधात अन्य पक्षाने ब्राह्मण उमेदवार दिला तर मतांचे विभाजन होणार’’, असे शुक्लांनी सांगितले. गोरखपूरमध्ये योगींच्या विरोधात ‘सप’ने दिवंगत ब्राह्मण नेते उपेंद्र शुक्ला यांची पत्नी शुभावती यांना उमेदवारी दिली आहे. भाजपमधील काही ब्राह्मण नेत्यांनी शुभावती यांना निवडणुकीसाठी आर्थिक कुमक पुरवल्याचे सांगितले जाते.
चिल्लूपार मतदारसंघातील साडेचार लाख मतदारांमध्ये दीड लाख ब्राह्मण मतदार असून इथे ३७ वर्षे हरिशंकर तिवारी यांचे वर्चस्व राहिलेले आहे. आताही विनय शंकर तिवारींसारख्या प्रभावी नेत्यांमध्ये ते कुठल्याही पक्षात असले तरी विजयी होण्याची क्षमता आहे. अशा नेत्यांना ‘सप’ने सायकलवर बसले आहे, काँग्रेसचा हात पकडण्याचे धाडस अजून या नेत्यांनी केलेले नाही. ‘‘पक्ष संघटना कमकुवत असेल तर हे बलाढय़ नेते काँग्रेसमध्ये कसे जातील? उत्तर प्रदेशातील प्रस्थापित काँग्रेसवाले ब्राह्मणांना पक्षात घ्यायला उत्सुक नसतात’’, असा दावा दुबेंनी केला. गोरखपूर-शहर मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्याचे दुबेंचे प्रयत्न अपयशी ठरले. इथून चेतना पांडे या ब्राह्मण महिला उमेदवाराची काँग्रेसने निवड केली आहे.