उत्तर प्रदेशात सध्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. राजकीय नेत्यांकडून रोड शो काढण्यात येत असून गुरुवारी अखिलेश यादव आणि प्रियंका गांधी आमने-सामने आले. दोन्ही नेत्यांचे रोड-शो एकाच वेळी पोहोचले आणि कार्यकर्त्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी प्रियंका गांधी आणि अखिलेश यादव यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवत एकमेकाला नमस्कर केला. विशेष म्हणजे दोन्ही नेत्यांनी ट्विटरलाही हा क्षण शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हिडीओमध्ये प्रियंका गांधी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्याकडे हास्यमुद्रेने नमस्कार करताना दिसत आहे. यावेळी अखिलेश यादव हे राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख जयंत चौधरी यांच्यासोबत रथामध्ये होते. प्रियंका गांधी यांनी नमस्कार केल्यानंतर अखिलेश यादव आणि जयंत चौधरी यांनीही त्यांना नमस्कार केला. तसंच नंतर रथाच्या वरती आल्यानंतर पुन्हा एकदा हात दाखवला.

दरम्यान यावेळी समाजवादी पक्ष आणि काँग्रेसचे कार्यकर्ते घोषणाबाजी करत झेंडे फडकावत होते. एकमेकांसमोर आल्याचा फोटो ट्विट करत अखिलेश यांनी, ‘एक दुआ-सलाम ~ तहज़ीब के नाम’ या कॅप्शनसहीत पोस्ट केलाय.

अखिलेश यादव यांच्या ट्विटला प्रियंका गांधी यांनीही उत्तर दिलं असून “तुम्हालाही आमच्याकडून राम राम” असं म्हटलं आहे.

उत्तर प्रदेशात १० फेब्रुवारीपासून निवडणुकीला सुरुवात होत आहे. भाजपासाठी अखिलेश यादव एक मोठं आव्हान ठरत आहेत. दुसरीकडे प्रियंका गांधींच्या नेतृत्वात निवडणूक लढणाऱ्या काँग्रेसने कोणासोबतही युती केलेली नसून निवडणुकीतही चांगल्या कामगिरीची अपेक्षा कमी आहे.

प्रचारादरम्यान अखिलेश यादव आणि प्रियंका गांधी एकमेकांवर आरोप करत आहेत. मात्र याचा वैयक्तिक संबंधांवर त्यांनी परिणाम होऊ दिलेला नाही. ऑक्टोबरमध्ये व्हायरल झालेल्या एका फोटोत देन्ही नेते दिल्ली-लखनऊ विमानात एकमेकांना अभिवादन करत असल्याचं दिसलं होतं.

२०१७ मध्ये काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने युती केली होती. मात्र ही युती अपयशी ठरली होती. काँग्रेसला १०५ पैकी फक्त सात जागा जिंकता आल्या तर समाजवादी पक्ष २०१२ मधील २२४ वरुन थेट ४७ जागांवर आला होता. यामुळेच यावेळी दोन्ही पक्षांनी युती केलेली नाही.