देशभरात पाच राज्यांमधील निवडणुकांमुळे राजकारण चांगलेच तापले आहे. यादरम्यान, अनेक आरोप-प्रत्यारोप आणि प्रतिक्रिया समोर येत आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या पक्षाच्या विजयासाठी जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले. भयमुक्त, दंगलमुक्त आणि गुन्हेगारीमुक्त राज्यासाठी मतदान केलेच पाहिजे असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. योगी आदित्यनाथ यांच्या भयमुक्त उत्तर प्रदेशच्या वक्तव्यावरुन बॉलिवूड अभिनेत्याने निशाणा साधला आहे.

योगी आदित्यनाथ यांचे हे ट्विट व्हायरल झाले असून सोशल मीडियावर युजर्सनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. अभिनेता आणि चित्रपट निर्माता कमाल आर खानने योगी आदित्यनाथ यांना प्रश्न विचारला आहे. “भयमुक्त, दंगलमुक्त, गुन्हेगारीमुक्त राज्य, राष्ट्रवादाच्या विजयासाठी, ‘आत्मनिर्भर आणि नवीन उत्तर प्रदेश’च्या निर्मितीसाठी आणि लोकांच्या उन्नतीसाठी, तुम्ही सर्वांनी मतदान केलेच पाहिजे… आधी मतदान करा, मग अल्पोपाहार…”, असे योगी आदित्यनाथ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Nana Patole criticizes government and law and order in state after attacked on saif ali khan in his house
सैफवरील हल्ला राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा; नाना पटोले यांची टीका
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
Hemlata Patil
Hemlata Patil : काँग्रेसला मोठा धक्का? ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रवक्त्या डॉ.हेमलता पाटील पक्ष सोडणार?
mumbai High Court encroachment Sanjay Gandhi Udyan
संजय गांधी उद्यान अतिक्रमणमुक्तच हवे, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला खडेबोल
Traffic police and Municipal Corporation are trying to speed up traffic in Pune news
पिंपरी: खंडणीखोरांविरोधात आक्रमक; औद्योगिक तक्रार निवारण पथकामार्फत ११ गुन्हे दाखल
BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
Chhagan Bhujbal On Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : “…अन्यथा दंडासह रक्कम वसूल करण्यात येईल”, लाडकी बहीण योजनेबाबत छगन भुजबळांचं मोठं विधान

योगी आदित्यनाथ यांच्या या ट्विटवर केआरकेने प्रतिक्रिया दिली आहे. “सर योगी आदित्यनाथ, तुमच्यावर १३८ गुन्हे दाखल आहेत. मग भयमुक्त सरकार कसे येणार? देव मतदारांना सुबुद्धी देवो!,” असे केआरके आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

“आज ज्या भागात मतदान होत आहे, तिथे सकाळी सर्व नेत्यांनी टीव्ही चॅनेलच्या कॅमेऱ्यांसमोर देवाची पूजा केली! म्हणजेच पूजा हे त्यांच्यासाठी प्रसिद्धीचे साधनही आहे! हे लोक पूजाही फक्त जनतेला मूर्ख बनवण्यासाठी करतात!,” असे केआरकेने आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे.

या ट्विटवर लोकांनी योगींना समर्थन देत केआरकेवर टीका केली आहे. केआरके तुम्हाला बाबाजींचा बुलडोझर आठवल्याचे वाटत आहे, असे एका युजरने म्हटले आहे. मयंक नावाच्या युजरने, योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्वीपेक्षा अधिक कडक केली आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. या गोष्टीवर इथे प्रत्येकाचा विश्वास आहे. पण कमाल रशीद खान तुम्ही क्रूर वृत्तीसाठी ओळखले जातात. त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करू नका, असे म्हटले आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील ५९ जागांसाठी आज, रविवारी मतदान होत आहे. उत्तर प्रदेशमध्ये तिसऱ्या टप्प्याचे मतदान होत असून तेथे मतदानाचे सात टप्पे आहेत. उत्तर प्रदेशातील १६ जिल्ह्यांतील ५९ मतदारसंघांत रविवारी मतदान होत आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव करहल मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तेथेही मतदान होत आहे. त्यांच्या विरोधात भाजपाचे उमेदवार केंद्रीयमंत्री एस. पी. सिंह बघेल निवडणूक लढवत आहेत. गेल्या वेळी या ५९ पैकी ४९ जागा भाजपाने जिंकल्या होत्या, तर समाजवादी पक्षाला नऊ जागा जिंकता आल्या होत्या.

Story img Loader