उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने १७ उमेदवारांची नवी यादी जाहीर केली आहे. या यादीत लखनऊमधील नऊ जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. भाजपाने चर्चेतून अनेक नावे जाहीर करून आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यात सरोजिनी नगरची जागा सर्वाधिक चर्चेत आहे. याठिकाणाहून आमदार म्हणून निवडून आलेल्या योगी सरकारमधील महिला व बालविकास मंत्री स्वाती सिंह यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे.
२०१७ मध्ये स्वाती सिंह यांनी ही जागा जिंकली होती. त्यांचे पती दयाशंकर सिंह हेही या जागेवरून तिकीटावर दावा करत होते. मात्र आता राजेश्वर सिंह यांना भाजपाने सरोजिनीनगर मतदारसंघातून रिंगणात उतरवले आहे. ईडीचे सहसंचालक असलेले राजेश्वर सिंह यांनी व्हीआरएस घेतल्यानंतर भाजपामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर व्हीआरएस स्वीकारल्यानंतर २४ तासांच्या आत त्यांना उमेदवार घोषित करण्यात आले.
भाजपाने नवा खेळ खेळत या जागेवरुन ईडीचे अधिकारी राजेश्वर सिंग यांना उमेदवारी दिली आहे. काही काळापूर्वी राजेश्वर सिंह यांनी ईडीमधून निवृत्ती घेऊन भाजपामध्ये प्रवेश केला होता. बीटेक आणि पोलीस, मानवाधिकार आणि सामाजिक न्याय या विषयात पीएचडीसह सिंह उत्तर प्रदेशातून प्रतिनियुक्तीवर २००९ मध्ये ईडीमध्ये रुजू झाले होते. त्यानंतर ते राज्य पोलीस सेवेत अधिकारी म्हणून कार्यरत होते. राजेश्वर सिंह हे उत्तर प्रदेशच्या सुलतानपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. ईडीचे अधिकारी म्हणून त्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास हाताळला. त्यांनी २जी स्पेक्ट्रम, राष्ट्रकुल स्पर्धेतील अनियमितता यासारख्या हायप्रोफाईल प्रकरणांची चौकशी केली होती.
आता सिंह यांचे भाजपामध्ये प्रवेश आणि उमेदवार होणे हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. त्यांच्या कारकीर्दीमुळे सिंह सतत चर्चेत होते. लखनऊमध्ये कार्यरत असताना राजेश्वर सिंह यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हा अर्ज केला होता. असीम अरुण यांच्याप्रमाणेच राजेश्वर सिंग हेही अतिशय उच्चपदस्थ अधिकारी राहिले आहेत. राजेश्वर सिंह यांनी सहाराचे प्रमुख सुब्रत रॉय आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्यावरील कारवाईमुळे चर्चेत राहिले आहेत. राजेश्वर सिंह यांच्यावरही बेहिशोबी मालमत्तेचे आरोप होते. या आरोपांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीही झाली. कॉमनवेल्थ गेम्स, टूजी स्पेक्ट्रम आणि कोळसा घोटाळा यांसारख्या प्रकरणांच्या तपासातही राजेश्वर सिंह यांचा सहभाग आहे.
राजेश्वर सिंह हे मूळचा उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यातील पाखरौली येथील आहे. त्यांनी बी.टेक.ची पदवी घेतली आहे. यासोबतच राजेश्वर सिंह यांनी पोलीस, मानवाधिकार आणि सामाजिक न्याय या विषयात पीएचडी केली आहे. १९९६च्या बॅचचे (तात्पुरती पोलीस सेवा) पीपीएस अधिकारी असण्यासोबतच त्यांनी उत्तर प्रदेशात पोलीस अधिकारी म्हणूनही काम केले आहे. २००९ मध्ये ते अंमलबजावणी संचालनालयात रुजू झाले. सहा वर्षांनंतर म्हणजेच २०१५ मध्ये त्यांचा कायमस्वरूपी ईडीच्या कॅडरमध्ये समावेश करण्यात आला. त्यानंतर त्यांना ईडी लखनऊ झोनचे सहसंचालकही करण्यात आले. ईडीमध्ये रुजू झाल्यानंतरच त्यांचे नाव हायप्रोफाईल प्रकरणांशी जोडले जात होते.