अपर्णा यादव यांच्या भाजपा प्रवेशावर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. अखिलेश यादव यांनी, समाजवादी पक्षाच्या विचारसरणीचा विस्तार झाल्याचा आनंद आहे, असे म्हटले आहे. मुलायमसिंग यादव यांनी अपर्णा यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केल्याचेही ते म्हणाले. अखिलेश यादव यांनी बुधवारी सांगितले की, उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणूक लढवल्यास आधी आझमगडमधील लोकांची परवानगी घेईन.
“सर्वप्रथम मी अभिनंदन आणि शुभेच्छा देऊ इच्छितो आणि त्याचवेळी समाजवादी विचारसरणीचा विस्तार होत असल्याचा आम्हाला आनंद आहे. मला आशा आहे की आमची विचारधारा तिथे संविधान वाचवेल,” असे अखिलेश यादव म्हणाले. अपर्णा यांना मुलायमसिंह यादव यांचा आशीर्वाद आहे का? त्याला उत्तर देताना अखिलेश म्हणाले, नेताजींनी समजावण्याचा खूप प्रयत्न केला.
समाजवादी पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे अपर्णा यांनी पक्ष बदलला का? असे विचारले असता, अखिलेश म्हणाले, “अजून तिकिटे जाहीर केली गेली नाहीत. तिकीट कोणाला मिळणार आणि कोणाला मिळणार नाही, हे जनतेवर अवलंबून आहे. ते अंतर्गत सर्वेक्षणावरही अवलंबून असते. अपर्णा यादव यांची खिल्ली उडवत अखिलेश पुढे म्हणाले की, त्यांना प्राण्यांची सेवा आवडते. आज उत्तर प्रदेशमध्ये गायी भुकेल्या आहेत. गाई मातेला उपाशी ठेवणाऱ्यांना पाप लागेल.
मुख्यमंत्री योगींकडून अपर्णा यादव यांचे स्वागत
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षाचे (सपा) अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांची धाकटी सून असलेल्या अपर्णा यादव यांचे भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याबद्दल स्वागत केले आहे. “भाजपा परिवारात अपर्णा जी यांचे स्वागत आहे,” असे योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी ट्विट करत म्हटले. मुख्यमंत्र्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत अपर्णा यांचा फोटोही ट्विट केला.
मुलायम यांच्या धाकट्या सुनेचा भाजपमध्ये प्रवेश
सपा प्रमुख आणि ज्येष्ठ नेते मुलायम सिंह यादव यांची धाकटी सून अपर्णा यादव यांनी बुधवारी दिल्लीतील भाजपा मुख्यालयात पक्षात प्रवेश केला. भाजपाच्या उत्तर प्रदेश युनिटचे अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि पक्षाच्या मीडिया विभागाचे प्रभारी अनिल बलूनी यांनी त्यांना पक्षाचे सदस्यत्व दिले.