Premium

UP election : योगी आदित्यनाथांचं भवितव्य ठरवणारं मतदान उद्या ; सहाव्या टप्प्यात ६७६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

५७ जागांसाठी मतदान होणार ; अनेक दिग्ग्जांची प्रतिष्ठा लागली पणाला

I am bhagwadhari says cm yogi adityanath on dimple yadav comment
(फोटो -PTI)

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात उद्या (गुरुवार) ५७ जागांसाठी मतदान होणार असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, काँग्रेसचे अजय कुमार लल्लू आणि समाजवादी पक्षाचे स्वामी प्रसाद मौर्य यासारख्या राजकीय दिग्गजांच्या भवितव्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सहाव्या टप्प्यात पूर्वांचलमधील आंबेडकर नगर ते गोरखपूरपर्यंतच्या जागांवर राजकीय संघर्ष होणार आहे. ४०३ पैकी २९२ जागांवर पाच टप्प्यात मतदान झाले आहे. सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात उर्वरित ५४ जागांवर मतदान होणार आहे. सहाव्या टप्प्यात एकूण ६७६ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. तर, सहाव्या टप्प्यामधील ५७ विधानसभा मतदारसंघांपैकी ११ राखीव आहेत, जे भाजपसाठी महत्त्वाचे आहेत. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत यापैकी ४६ जागा भाजपाने जिंकल्या होत्या.

उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी अजय कुमार शुक्ला यांनी सांगितले की, सहाव्या टप्प्यातील प्रचार मंगळवारी संध्याकाळी ६ वाजता संपला आणि मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

यावेळी रिंगणात असलेल्या ६७६ उमेदवारांमध्ये गोरखपूर शहरमधून आपली पहिली विधानसभा निवडणूक लढवत असलेले योगी आदित्यनाथ, तमकुही राज मतदारसंघातून लढणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू आणि समाजवादी पक्षात सामील होण्यासाठी भाजपाचे मंत्रीपद सोडणारे आणि फाजिलनगरमधून लढणारे स्वामी प्रसाद मौर्य यांचा समावेश आहे.

समाजवादी पक्षाने भाजपाचे दिवंगत नेते उपेंद्र दत्त शुक्ला यांच्या पत्नीला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात उभे केले आहे. तर, आझाद समाज पक्षाचे संस्थापक चंद्रशेखर आझाद हे देखील योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Up election 6th phase of polls tomorrow to decide fate of yogi adityanath msr

First published on: 02-03-2022 at 16:35 IST
Show comments