उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्य पार्श्वभूमीवर आज भाजपाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवणार यांची सर्वांनाच उत्सुकता होती. शिवाय, योगी हे यंदा अयोध्या किंवा मथुरा मधून निवडणूक लढवतील अशी जोरदार चर्चा देखील सुरू होती. अखेर ही चर्चा आज थांबली आहे. कारण, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भाजपाने गोरखपूर(शहर) मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. तर, गोरखपूर येथून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री योगी यांची पहिली प्रतिक्रिया देखील समोर आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
“भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष आणि संसदीय मंडळाचा मी आभारी आहे. ज्यांनी मला गोरखपूरमधून भाजपाचा उमेदवार बनवलं आहे. गोरखपूरची जनता व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने तसेच, समस्त सद्यस्थितीमधील व पूर्वीच्या लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने भाजपा केवळ गोरखपूर येथेच नाही तर संपूर्ण राज्यात प्रचंड बहुमातने सरकार स्थापन करेल. हे तुम्हाला सगळ्यांना दिसून येईल.” असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
तसेच, “तुम्ही सगळेजण पाहाल की भाजपाने राष्ट्रवाद, विकास आणि सुशासनाच्या मुद्य्यावर ज्या प्रभावी पद्धतीने काम केलं आहे. ते सगळ्यांच्या समोर आहे. सबका साथ सबका विकास या भावनेसह भाजपा प्रचंड बहुमताचं सरकार १० मार्चला निकाल जाहीर झाल्यावर बनवेल.” असं योगींनी यावेळी बोलून दाखवलं.
भाजपाकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीनुसार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर, मथुरा मतदारसंघातून भाजपाने विद्यमान ऊर्जामंत्री श्रीकांत शर्मा यांना तिकीट दिले आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य प्रयागराजच्या सिरथू मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. भाजपाने पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील विधानसभा जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत.
यादी जाहीर करताना धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, १०७ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. ६३ विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट देण्यात आले आहे. २१ नवीन उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले असून यामध्ये तरुण, महिला आणि समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे.