Uttar Pradesh Exit Poll 2022 : उत्तर प्रदेशमध्ये शेवटच्या टप्प्यासाठी मतदान पार पडले आहे. मतदानानंतर एग्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत. उत्तर प्रदेशातील  या सर्वात मोठ्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजपाचे सरकार स्थापन होईल की अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष सत्तेत येणार? की काँग्रेस किंवा बसपा काही चमत्कार करणार? या प्रश्नांची नेमकी उत्तरे १० मार्चला मिळणार आहेत. पण एग्झिट पोलच्या माध्यमातून उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारतो हे सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. एक्झिट पोलच्या निकालातून १० मार्चच्या निकालाचे भाकीत ठरवण्यात येत आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे मतदान संपल्याने एग्झिट पोल आले आहेत. एक्झिट पोल जाहीर करणाऱ्या सर्व एजन्सी आणि वाहिन्यांनी भाजपाला स्पष्ट बहुमत दिले आहे. त्यापैकी पाच मुख्य वाहिन्यांची सरासरी काढली तर त्यातही भाजपा २५० च्या पुढे जाईल असे दिसते. इंडिया टुडेने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक ३०७ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. दुसरीकडे, सपाबद्दल बोलायचे झाले तर, सरासरी ७१ ते १०१ जागा मिळण्याची अपेक्षा आहे. याशिवाय चाणक्य टुडे-न्यूज २४ च्या सर्वेक्षणात भाजपाला २९४ जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडे, सपाला केवळ १०५ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

स्मृती इराणी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार? केजरीवालांना शह देण्यासाठी भाजपाचा प्लान काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Delhi Elections 2025 : स्मृती इराणी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार? केजरीवालांना शह देण्यासाठी भाजपाचा प्लान काय?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Ravindra Chavan talk on local body elections in exclusive interview with Loksatta
‘शक्तिशाली’ भारतासाठी ‘बलशाली’ भाजप आवश्यक
ajit pawar ncp latest news in marathi
अजित पवार स्वबळावर लढणार का ?
scheme for unemployed youth promises rs 8500 per month
सत्तेत आल्यास सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा ८५०० रुपये : काँग्रेस
bjp deciding direction of campaign for the delhi assembly elections
लाल किल्ला : दिल्ली निवडणुकीची सूत्रे भाजपच्या हाती?
Loksatta anvyarth Lok Sabha Elections BJP Narendra Modi Chandrababu Naidu Telugu Desam Party
अन्वयार्थ: आहे ‘डबल इंजिन’ तरीही…
ec hearing against district collector dr sachin ombase for obstructing election process
लोकसभा निवडणुकीत जिल्हाधिकार्‍यांचा सावळा गोंधळ; निवडणूक आयोगाकडून दखल; जिल्हाधिकार्‍यांची सुनावणी

रिपब्लिक पी मार्क एग्झिट पोल

रिपब्लिक पी मार्क एग्झिट पोलनुसार भाजपाला पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमध्ये बहुमत मिळू शकते. भाजपला २४० जागा मिळण्याची शक्यता आहे. सपाला १४० जागा मिळण्याचा अंदाज आहे. बसपाला पुन्हा एकदा १४ जागांवर समाधान मानावे लागू शकते. भाजपला ४०.१ टक्के जागा मिळू शकतात. सपाला ३४ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. बसपाला १६.३ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.

न्यूज १८ पोल स्ट्रॅटच्या एग्झिट पोलमध्ये भाजपा सरकार

न्यूज१८ पोल स्ट्रॅटनुसार भाजपाला २११ ते २२५ जागा मिळू शकतात. सपाला १४६ ते १६० जागा मिळण्याचा अंदाज आहे. बसपाला १४ ते २४ जागा मिळू शकतात.

आज तक अॅक्सिस माय इंडियाचा उत्तर प्रदेश एग्झिट पोल

Aaj Tak Axis My India च्या एक्झिट पोलनुसार भाजपा पुन्हा एकदा ३०० चा आकडा पार करू शकतो. भाजपा आघाडीला २८८ ते ३२६ जागा मिळू शकतात. सपा आघाडीला ७१ ते १०१ जागा मिळू शकतात. बसपाला ३ ते ९ जागा मिळू शकतात. काँग्रेसला १ ते ३ जागांवर समाधान मानावे लागू शकते, तर इतरांच्या खात्यात २ ते ३  जागा मिळी शकतात.

न्यूज २४ टुडेज चाणक्यमध्येही भाजपाला बहुमत

न्यूज २४ टुडेज चाणक्यने दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपा २९४ जागा जिंकू शकतो. सपाला १०५ जागा मिळू शकतात. त्याचवेळी बसपाला अवघ्या २ जागांवर समाधान मानावे लागू शकते. काँग्रेस आणि इतरांना प्रत्येकी १ जागा मिळण्याचा अंदाज आहे.

टाईम्स नाऊ नवभारत अंदाजानुसार भाजपाला बहुमत

टाईम्स नाऊ नवभारत एग्झिट पोलनुसार भाजपाला २२५ जागा मिळू शकतात. सपा आघाडीच्या १५१ जागा कमी होऊ शकतात. बसपाला १४ जागा मिळाल्या तर काँग्रेसला फक्त ९ जागा मिळू शकतात.

उत्तर प्रदेशात सात टप्प्यात मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्याप १० फेब्रुवारी, दुसऱ्या टप्प्यात १४ फेब्रुवारी, तिसऱ्या टप्प्यात २० फेब्रुवारी, चौथ्या टप्प्यात २३ फेब्रुवारी, पाचव्या टप्प्यात २७ फेब्रुवारी, सहाव्या टप्प्यात ३ मार्च आणि सातव्या टप्प्यात ७ मार्च रोजी उत्तर प्रदेशात मतदान पार पडले आहे. उत्तर प्रदेशात ४०३ जागांसाठी मतदान पार पडले आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला २०२ जागांची आवश्यकता असणार आहे.

एग्झिट पोल म्हणजे काय

एग्झिट पोल हा एक प्रकारचा अंदाज आहे ज्यामध्ये सर्वेक्षण सर्वेक्षणकर्ता मतदारांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. यासाठी सहसा प्रश्नावली पद्धत वापरली जाते. यामध्ये मतदारांना प्रश्न विचारले जातात आणि त्यांनी कोणत्या पक्षाला मतदान केले ते त्यांच्या मते सांगतात. मतदारांच्या मताच्या आधारे, सर्वेक्षणकर्ते विश्लेषण करतात आणि त्यांचे निकाल काढतात. सर्वेक्षक अनेक वैज्ञानिक पद्धती वापरतात. निवडणूक सर्वेक्षण हे जगभरात एक आधुनिक माध्यम म्हणून उदयास आले आहे. पण एवढे करूनही त्यात अनेक तोटे आहेत आणि त्यामुळे १०० टक्के यशाची खात्री देता येत नाही.

Story img Loader