Assembly Elections 2022 Voting Updates: विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज (१४ फेब्रुवारी) गोवा, उत्तराखंडमधील सर्व जागांसह उत्तर प्रदेशातील ५५ जागांसाठी मतदान होत आहे. या तिन्ही राज्यांत सत्ता राखण्याचे आव्हान भाजपपुढे आहे. गोव्यातील ४० आणि उत्तराखंडमधील ७० जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. गोव्यात ११ लाख, तर उत्तराखंडमध्ये ८१ लाख मतदार आहेत.
गोवा आणि उत्तराखंड या दोन्ही राज्यांत याआधी दुरंगी लढत होत होती. मात्र, यंदा गोव्यात सत्ताधारी भाजप आणि मुख्य प्रतिस्पर्धी काँग्रेसबरोबरच आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस पक्ष रिंगणात उतरला आहे. गोव्यात तृणमूल काँग्रेस आणि मगोप या पक्षांची युती आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनीही निवडणूकपूर्व आघाडी जाहीर केली, तर आम आदमी पक्ष स्वबळावर लढत आहे.
Assembly Elections 2022 Voting Updates: गोवा आणि उत्तराखंडमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. तर उत्तर प्रदेशात दुसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या काही तास आधी, रविवारी संध्याकाळी भाजपा नेते हरेंद्र कुमार यांच्यावर समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला, जेव्हा ते त्यांच्या सहकाऱ्यांसह संभलमध्ये आपल्या घरी परतत होते. भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर संभलमधील असमोली मतदारसंघातून हरेंद्र कुमार पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत.
गोव्यातले आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार अमित पालेकर आणि त्यांच्या आईने मतदान केले. “बदल घडवून आणण्याचा हा आमचा क्षण आहे. लोक भ्रष्टाचाराला पराभूत करण्यासाठी उत्साहाने मतदान करत आहेत. आम्ही खूप मोठे बदल पाहणार आहोत,” अशी प्रतिक्रिया पालेकर यांनी दिली आहे.
आज सकाळी ११ वाजेपर्यंत गोव्यात २६.६३ टक्के, उत्तर प्रदेशात २३.०३ टक्के आणि उत्तराखंडमध्ये १८.९७ टक्के मतदान झालं आहे.
“मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून आतापर्यंत ११.०४ टक्के मतदान झालं आहे. यावेळी अधिकाधिक लोकांनी मतदान करावं, अशी आमची इच्छा असून, विक्रमी मतदानाची अपेक्षा आहे. मॉक पोल दरम्यान ५ कंट्रोल युनिट्स, ११ VVPAT बदलण्यात आले, ही एक सामान्य प्रक्रिया आहे,” गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, चर्चिल आलेमाव (तृणमूल काँग्रेस), रवी नाईक (भाजप), लक्ष्मीकांत पार्सेकर (अपक्ष), विजय सरदेसाई (गोवा फॉर्वर्ड पक्ष), सुदीन ढवळीकर (मगोप), माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल आदी निवडणुकीच्या रिंगणात आहेत़ राज्यात २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक १७, तर भाजपला १३ जागा मिळाल्या होत्या़ मात्र, भाजपने सत्तेचे गणित जमवून काँग्रेसला धोबीपछाड दिला होता़
शपथविधी झाला की लगेचच नव्याने निवडून आलेलं भाजपा सरकार राज्यात समान नागरी संहितेचा मसुदा तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करेल, असं आश्वासन उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी प्रचारादरम्यान दिलं होतं.
जितन प्रसाद म्हणाले, “भाजपा उत्तर प्रदेशात ३०० पेक्षा जास्त जागा जिंकून पुन्हा सत्तेत येईल, असा मला विश्वास आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाचा ट्रेंड पाहता जनतेने भाजपाला मतदान केल्याचं स्पष्ट आहे. दुसऱ्या टप्प्यात लोक पुन्हा कामाच्या आधारावर भाजपाला मतदान करतील.”
I can say confidently that BJP is going to return to power in Uttar Pradesh with 300 plus seats.Trends for the first phase of election show that people have voted for BJP. Today in the second phase people will bless BJP again on the basis of work that has been done: Jitin Prasada pic.twitter.com/wSzEf2J1OS
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) February 14, 2022
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क
गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत ने विधानसभा चुनाव में मतदान किया।
— ANI_HindiNews (@AHindinews) February 14, 2022
मुख्यमंत्री प्रमोद सावंत ने कहा, "भाजपा ने 10 साल से जो काम किया है वो लोगों के सामने है, उसे देखकर स्थिर सरकार बनाने के लिए हमारे सभी उम्मीदवारों के लिए मतदान करें।" #Goaelection2022 pic.twitter.com/X48BSK1gAZ
मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, “भाजपाने १० वर्षात जी कामं केली ती जनतेसमोर आहेत. ही कामं पाहून मतदारांनी राज्यात स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी आमच्या मतदारांना मतदान करावं.”
मतदानाला सुरुवात, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडून पत्नीसह रुद्रेश्वराला प्रार्थना
Goa CM Pramod Sawant and his wife Sulakshana Sawant offer prayers at Shree Rudreshwar Devasthan, Harvalem. Voting for #GoaElections2022 is underway. pic.twitter.com/BTgqnCGIyh
— ANI (@ANI) February 14, 2022
यंदा जनता आम्हाला ६० पेक्षा जास्त जागा निवडून देऊन आशिर्वाद देणार : मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी
मैं सभी लोगों से अपील करता हूं कि घरों से बाहर आएं और वोटिंग के सभी पुराने रिकॉर्ड तोड़ दीजिए। हम आश्वत है कि इस बार राज्य की जनता हमें 60 से ज़्यादा सीटें देकर आशीर्वाद देगी: उत्तराखंड के मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, खटीमा #UttarakhandElections2022 pic.twitter.com/YygAUGXcyM

उत्तराखंडमध्ये, या निवडणुकीत ज्यांचे भवितव्य ठरणार आहे, त्यात मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी सतपाल महाराज, सुबोध उनियाल, अरविंद पांडे, धनसिंग रावत आणि रेखा आर्य यांच्याशिवाय प्रदेश भाजप अध्यक्ष मदन कौशिक यांचा समावेश आहे. काँग्रेसच्या प्रमुख उमेदवारांमध्ये माजी मुख्यमंत्री हरीश रावत, माजी मंत्री यशपाल आर्य, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गणेश गोदियाल आणि चौथ्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते प्रीतम सिंह यांचा समावेश आहे.
उत्तर प्रदेशमध्ये सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होत आहे. या टप्प्यातील ५५ जागांपैकी २०१७ मध्ये भाजपने ३८ जागा जिंकल्या होत्या, तर समाजवादी पक्षाला १५ आणि काँग्रेसला दोन जागा मिळाल्या होत्या. गेल्या विधानसभा निवडणुकीत सपा आणि काँग्रेसने युती केली होती. या टप्प्यात मतदान होणार्या भागात बरेलवी आणि देवबंद पंथाच्या धार्मिक नेत्यांचा प्रभाव असलेली मुस्लीम लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि ते समाजवादी पक्षाचे गड मानले जातात.