वर्ष २०२५ हे भारतासाठी एक महत्त्वाचं निवडणूक वर्ष आहे. या वर्षी देशात एप्रिल-मे महिन्यात सार्वत्रिक निवडणुका अर्थात लोकसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांचे निकाल भारताची भविष्यातील दिशा निश्चित करतील. या निवडणुकीत एकूण ५४३ जागांसाठी मतदान होईल. हे मतदान वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये होईल. लोकसभा निवडणुकांव्यतिरिक्त या वर्षी भारतात ७ ते ८ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही होऊ घातल्या आहेत. एप्रिल आणि मे महिन्यातच आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, सिक्किम व ओडिशा विधानसभा निवडणुकाही होणार आहेत.
या राज्यांव्यतिरिक्त हरियाणा व महाराष्ट्रातही या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये ऑक्टोबर महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्याव्यतिरिक्त झारखंडमध्ये नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणुकांचं आयोजन केलं जाईल. या सर्व राज्यांव्यतिरिक्त जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातही या वर्षी कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदा विधानसभा निवडणुका घेतल्या जाऊ शकतात. इथे जेव्हा जम्मू-काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा होता, तेव्हा निवडणुका झाल्या आहेत. स्थानिक परिस्थितीवर इथल्या निवडणुकांचा निर्णय घेतला जाऊ शकतो. जाणकारांच्या मते जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुका घेतल्या जाण्याची दाट शक्यता आहे.