लखनऊ : उत्तर प्रदेशात पुन्हा सत्तेत आल्यास लव्ह जिहादच्या प्रकारात सहभागी असलेल्यांना दहा वर्षे शिक्षा व एक लाख रुपये दंडाची तरतूद करण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. याबाबतची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. शहांच्या उपस्थितीत पक्षाच्या लोकसंकल्प पत्राचे अनावरण शहा यांच्या उपस्थितीत झाले. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला दोन दिवस शिल्लक असताना भाजपने जाहीरनामा प्रकाशित केला आहे. गुरुवारी पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांपैकी ९२ टक्के गोष्टींची पूर्तता करण्यात आल्याचा दावा शहा यांनी केला.
संकल्पपत्रात काय?
* पुढील पाच वर्षे शेतकऱ्यांसाठी मोफत वीज
* उसाची देयके कारखान्यांनी १४ दिवसांत केली नाहीत तर व्याजासह रक्कम देणे बंधनकारक
* प्रत्येक जिल्ह्यात सरकारी रुग्णालय
* मुलींना राणी लक्ष्मीबाई योजनेंतर्गत मुलींना मोफत दुचाकी
* दोन कोटी टॅबलेट व स्मार्टफोन