उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाच्या तारखा अगदी जवळ आल्या आहेत. त्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्षांची तयारी सुरू असून उत्तर प्रदेशच्या राजकारणात अनेक बदल पाहायला मिळत आहेत. अनेक नेत्यांची पक्षांतरं सुरू आहेत. भाजपाच्या अनेक विद्यमान आमदारांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला. तर इतर पक्षातील अनेक नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याचं पाहायला मिळालं. त्यातच आज काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचे स्टार प्रचारक आणि यूपीए सरकारमध्ये मंत्री असलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते आरपीएन सिंह यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. ते आता भाजपामध्ये प्रवेश करू शकतात, अशा चर्चा आहेत.

सोनिया गांधींना पाठवला राजीनामा…

भाजपाला नवीन वर्षात मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष; कशी पार पडणार निवडणुकीची प्रक्रिया? जाणून घ्या... (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP President Election : भाजपाला नवीन वर्षात मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष; कशी पार पडणार निवडणुकीची प्रक्रिया? जाणून घ्या…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
one nation one election
मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाची ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
Vijay Vadettiwar statement regarding the Leader of the Opposition Nagpur news
सरकारला विरोधी पक्षनेता हवा असेल तरच नाव देऊ -वडेट्टीवार
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक
navneet rana and balwant wankhede
Navneet Rana : “मी राजीनामा देतो, पण…”, नवनीत राणांना खासदार बळवंत वानखेडेंचं प्रतिआव्हान!
Sadabhau Khot On Maharashtra Cabinet Expansion
Sadabhau Khot : “मोठ्या पक्षांची मंत्रिपदे नंतर निश्चित करा, आधी…”, सदाभाऊ खोत यांनी महायुतीच्या नेत्यांकडे केली ‘ही’ मागणी

आरपीएन सिंग यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना राजीनामा पाठवला आहे. त्यात त्यांनी लिहिलंय की, “आज, जेव्हा संपूर्ण देश प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे, तेव्हा मी माझ्या राजकीय जीवनात एक नवीन अध्याय सुरू करत आहे. मी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तात्काळ राजीनामा देत आहे. मला देश, जनता आणि पक्षाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद.”

मनमोहन सिंग सरकारमध्ये मंत्री असलेले आरपीएन सिंग आज म्हणजेच मंगळवारी भाजपामध्ये प्रवेश करू शकतात, असं म्हटलं जातंय. आरपीएन सिंग यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने केवळ काँग्रेसच्याच नव्हे तर सपाच्या अडचणीत वाढ होईल, असं बोललं जातंय. कारण ते पूर्वांचलमधील प्रभावी नेते आहेत.

स्वामी प्रसाद मौर्य यांच्या अडचणी वाढणार…

न्यूज १८ने दिलेल्या वृत्तानुसार, भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर आरपीएन सिंह कुशीनगरच्या त्यांच्या गृहजिल्ह्यातील पडरौना मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. जर सिंग यांनी पडरौना मधून निवडणूक लढवली तर, स्वामी प्रसाद मौर्य यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते, कारण स्वामीही या जागेवरून निवडणूक लढवण्याचा विचार करत आहेत. स्वामींच्या विरोधात भाजपा आरपीएन सिंग यांना उमेदवारी देऊ शकते. पदरौना राजघराण्यातील असलेल्या आरपीएन सिंह यांचे पूर्ण नाव कुंवर रतनजीत प्रताप नारायण सिंह आहे. पडरौना हे यूपी आणि बिहारच्या सीमेवर वसलेले शहर आहे. कुशीनगर आधी देवरिया जिल्ह्यात होते. पण आता ते वेगळे करून कुशीनगर जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आले आहे.

सिंग यांची राजकीय कारकीर्द..

सिंग १९९६, २००२ आणि २००७ च्या विधानसभा निवडणुकीत या पडरौना विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर आरपीएनचे तीन वेळा आमदार राहिले आहेत. यानंतर, २००९ च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून ते खासदार झाले आणि मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारमध्ये गृह राज्यमंत्रिपदाची जबाबदारी मिळाली. मात्र, त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांना सतत पराभव पत्करावा लागला होता.

Story img Loader