पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र आता बऱ्यापैकी स्पष्ट होत आले आहे. एग्जिट पोलमध्ये लावण्यात आलेल्या अंदाजांनुसार युपीमध्ये भाजपा विजयाच्या दिशेने कूच करत आहे. ट्रेंडमध्ये पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तसेच, उत्तराखंडमध्येही भाजपा आघाडीवर आहे. येथे भाजपाला ४४ जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव आणि काँग्रेसच्या प्रियांका गांधीही जनतेला आपल्याकडे वळवण्यात अयशस्वी ठरले आहेत. तथापि, भाजपाला मिळालेल्या यशानंतरही पक्षाला काही गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अपेक्षेपेक्षा कमी जागांवर विजय

ट्रेंडनुसार, एकटी भाजपा युपीमध्ये २५२ जागांवर आघाडीवर आहे. युतीबाबत बोलायचे झाले तर हा आकडा २७० होतो. सत्तेवर येण्यासाठी भाजपाला या जागा पर्याप्त असल्या तरीही मागील निवडणुकांच्या तुलनेत या निवडणुकीत पक्षाला काही जागांचे नुकसान झाले आहे. सध्याच्या ट्रेंडनुसार, २०१७ मध्ये यूपीमध्ये भाजपने जिंकलेल्या जागांची संख्या यावेळी ६०ने कमी आहे. त्याचप्रमाणे, उत्तराखंडमध्येही पक्षाला जवळपास १३ जागांचे नुकसान होताना दिसत आहे.

निकाल जाहीर होण्याआधीच ‘आप’ चे सेलिब्रेशन; पक्ष कार्यालयाबाहेरील बॅनर ठरतोय चर्चेचा विषय

समाजवादी पार्टीला अपेक्षेप्रमाणे निकाल मिळाला नसला, तरीही पक्षप्रमुख अखिलेश यादव यांच्यासाठी समाधानकारक बाब अशी की, त्यांच्या समर्थकांच्या संख्येत वाढ झाली आहे. मागील निवडणुकीत सपाला जितक्या जागा मिळाल्या होत्या, यंदा त्यापेक्षा अधिक जागांवर सपा निवडून आली आहे. ट्रेंडमध्ये, सपा ११९ जागा एकटी जिंकत आहे, हा आकडा गेल्या वेळेपेक्षा ७३ने जास्त आहे. याचाच अर्थ असा, २०१७ पासून आतापर्यंत अखिलेश यादव यांनी जे प्रयत्न केले, त्याचा त्यांना नक्कीच फायदा झाला आहे.

Election Results: डिपॉजिट जप्त म्हणजे नेमकं काय?; नेमकी किती रक्कम केली जाते जप्त?

काँग्रेसबद्दल बोलायचे झाले तर यूपीमध्ये यावेळीही पक्षाला फटका बसला आहे. २०१७ मध्ये काँग्रेसला ७ जागा मिळाल्या होत्या. ट्रेंडमध्ये, हा आकडा ४ वर दिसत आहे. म्हणजेच पक्षाला ३ जागांचे नुकसान झाले आहे. काँग्रेसने यूपीमध्ये यावेळी प्रियांका गांधी यांना पक्षाचा चेहरा बनवले होते. त्यांच्या सभांना ज्या प्रकारे गर्दी जमत होती, त्यावरून प्रियांका गांधी काँग्रेससाठी संजीवनी ठरू शकतील असे वाटत होते. पण तसे झाले नाही.