उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा पहिला टप्पा गुरुवारी पार पडला. या पहिल्या टपप्यानंतर आता राजकीय पक्षांनी आपला मोर्चा दुसऱ्या टप्प्यातील मतदान असणाऱ्या मतदारसंघाकडे वळवलाय. याच पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार सुरु केला आहे. भारतीय जनता पार्टीने सुद्धा दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक सभा याच मतदारसंघांमधील मतदारांना आकर्षित करण्यासाठी आयोजित केलीय. पंतप्रधान मोदीच उत्तर प्रदेशमधील भाजपाचे सर्वात मोठे प्रचारक आहेत. मोदींनी कालच सहारनपुरमध्ये निवडणुकीची प्रचारसभा घेतली होती. आज ते कासगंजमध्ये एक मोठी सभा घेणार असून या सभेमध्ये एक लाख लोक जमतील असा दावा केला जातोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पंतप्रधान मोदींच्या या कासगंजमधील सभेसाठी राष्ट्रीय स्तरावरील नेतेही उपस्थित असतील. समोर आलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी दुपारी २ वाजून २० मिनिटांनी कासगंजमधील पटियाली विधानसभा मतदारसंघात पोहोचतील. मुस्लीमबहुल विधानसभा मतदारसंघामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीमधून पंतप्रधान कार्यकर्ते आणि समर्थकांना संबोधित करतील. दरियावगंजजवळच्या एका मैदानामध्ये मोदींची ही सभा होणार आहे. करोना कालावधीमधील ही पंतप्रधानांची सर्वात मोठी सभा असेल असा अंदाज व्यक्त केला जातोय.

पंतप्रधान मोदी ज्या कासगंजमध्ये सभा घेणार आहेत त्या जिल्ह्यात एकूण तीन मतदारसंघ आहेत. तसेच ज्या ठिकाणी सभा आहे तेथून जवळच बाजूच्या एटा जिल्ह्यामधील मतदारांवरही प्रभाव पाडण्यासाठी भाजपाने प्रयत्न सुरु केलेत. त्यामुळे या एका सभेतून मोदी चार मतदारसंघातील मतदारांना भाजपासाठी मतदान करण्याचं आवाहन करणार आहेत.

तब्बल ५३ वर्षांनंतर देशाच्या पंतप्रधान पदी असणारी व्यक्ती निवडणूक प्रचारासाठी कासगंजमध्ये येत आहे. यापूर्वी १९६९ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या ठिकाणी जाहीर सभा घेतली होती. त्यानंतर त्या १९७८ साली आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी मतं मागण्यासाठी माजी पंतप्रधान म्हणून येथील प्रचारसभेसाठी आल्या होत्या.

यासभेला पंतप्रधान मोदींबरोबरच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित असतील. केंद्रीय मंत्रीमंडळातील मोदींचे काही सहकारीही या सभेला उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.