उत्तर प्रदेश निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात नऊ जिल्ह्यांतील ५९ विधानसभा जागांवर एकूण ६३४ उमेदवार रिंगणात आहेत. पिलीभीत, लखीमपूर खेरी, सीतापूर, हरदोई, उन्नाव, लखनऊ, रायबरेली, बांदा आणि फतेहपूर जिल्ह्यातील ५९ विधानसभा मतदारसंघातील मतदार आज मतदान करणार आहेत.

२०१७च्या निवडणुकीत भाजपाने आज मतदान होत असलेल्या ५९ पैकी ५१ मतदारसंघ जिंकले होते. त्यावेळी समाजवादी पक्षाला चार तर मायावतींच्या बहुजन समाज पक्षाला तीन जागा मिळाल्या होत्या. आज मतदान होणार्‍या जिल्ह्यांपैकी लखीमपूर खेरी, पिलीभीत, रायबरेली, लखनऊ  या जिल्ह्यातील मतदारसंघ फार महत्वाचे मानले जातात.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लखीमपूर खेरीमध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारत चार शेतकर्‍यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. त्याच लखीमपूर जिल्ह्यातील मतदारसंघात आज निवडणुका होणार आहेत, त्यामुळे इथं स्थानिक कोणाला निवडून देतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.  

दुसरीकडे काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणारा रायबरेलीत या टप्प्यात मतदान होतंय. इथून काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या अदिती सिंह भाजपाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. तर सरोजिनी नगर मतदारसंघात भाजपचे माजी ईडी अधिकारी राजेश्वर सिंह आणि समाजवादी पक्षाच्या सरकारमधील माजी मंत्री अभिषेक मिश्रा यांच्यात लढत होणार आहे. लोकांनी मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहन अदिती सिंह यांनी केले. तसेच काँग्रेस या निवडणुकीत शर्यतीतच नसल्याचंही त्या म्हणाल्या. त्यांनी लालपूर चौहान येथील एका मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

UP Polls: ११ लाख नोकऱ्या, महिलांना ३३ टक्के आरक्षण; अखिलेश यादवांचं आश्वासन

उन्नावमध्येही मतदान सुरू झालं असून नागरिक मतदानासाठी केंद्रांवर पोहचू लागले आहेत.

“मुस्लिम समाजवादी पक्षावर खूश नाहीत. ते त्यांना मतदान करणार नाहीत. सपाला मतदान म्हणजे गुंडा राज, माफिया राजला मतदान आहे. म्हणून यूपीच्या लोकांनी मतदानापूर्वीच सपाला नाकारले आहे. सपा सरकारमध्ये दंगल झाली. सपा नेत्यांचा चेहराच सांगतो की ते सत्तेत येणार नाहीत,” असं बसपा प्रमुख मायावती म्हणाल्या.

विश्लेषण : उत्तर प्रदेश मतदान चौथा टप्पा – भाजप गतवेळचा प्रभाव कायम राखणार का?

मायावतींनी लखनऊमधील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

Story img Loader