उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये चुरशीने लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी थोड्याच वेळात सुरुवात होणार असून दुपापर्यंत निकालांचा कल स्पष्ट होईल. मात्र या मतमोजणीच्या पूर्वसंध्येलाच समाजवादी पक्षाने निवडणूक आयोगाला मतमोजणीचं लाइव्ह वेबकास्टींग करण्याची मागणी केलीय. मतमोजणीचं थेट प्रक्षेपण पाहता यावं यासाठी ही मागणी केलीय. समाजवादी पार्टीने या वेबकास्टींगची लिंक सर्व राजकीय पक्षांना देण्यात यावी अशीही मागणी केली. यापूर्वी वाराणसीमधील ईव्हीएम मशीन्सची जागा बदलण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन अखिलेश यादव यांनी प्रश्न उपस्थित करत भाजपावर निवडणुकीच्या मतमोजणीत गडबड करण्याचा आरोप केला होता. याच पार्श्वभूमीवर सपाने या वेबकास्टींगची मागणी केलीय. मात्र निवडणूक आयोगाने हे आरोप फेटाळून लावले.

उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाचे अध्यक्ष नरेश उत्तम पटेल यांनी देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी १० मार्चला होणाऱ्या मतमोजणीदरम्यान मतमोजणी केंद्रांवरुन वेबकास्टींग करण्याची आणि या वेबकास्टींगची लिंक सर्व राजकीय पक्षांना देण्याची मागणी केलीय. मतमोजणीचं थेट प्रक्षेपण व्हावं आणि राजकीय पक्षांना ते पाहता यावं या हेतूने ही मागणी करण्यात आलीय. समाजवादी पक्षाने यामुळे मतमोजणी पादर्शक, स्वतंत्र आणि निष्पक्ष पद्धतीने पार पडेल असं म्हटलंय.

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं? बावनकुळे म्हणाले... (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं?
Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
impeachment motion against justice Shekhar Yadav
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींविरोधात महाभियोगाची शक्यता; महाभियोग म्हणजे काय? आजवर किती न्यायाधीशांवर झाली कारवाई?
UPSC CSE Mains Result 2024 : यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षा 2024 चा निकाल जाहीर; ‘येथे’ ऑनलाइन पाहा निकाल
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक

नक्की वाचा >> UP Election Result च्या एक दिवस आधी योगींनी लहान मुलांसोबत घालवला वेळ; हेलिकॉप्टरमध्ये…

पटेल यांनी मतदानाच्या वेळीही लाइव्ह वेबकास्टींग करण्यात आल्याचं सांगितलंय. यावेळी वेबकास्टींगची लिंक निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आलेली. ते या थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून मतदानावर नजर ठेऊन होते. त्यामुळेच आता मतमोजणीलाही ही पद्धत वापरावी असं सपाचं म्हणणं आहे.

दरम्यान, बहुतांश मतदानोत्तर अंदाजानुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला पूर्ण बहुमत मिळेल. उत्तर प्रदेश विधानसभेत ४०३ जागा असून पक्षांना बहुमतासाठी २०२ सदस्यांचे संख्याबळ लागेल. ७० जागांच्या उत्तराखंडमध्ये बहुमतासाठी ३६ जागा जिंकाव्या लागतील. 

Story img Loader