उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये चुरशीने लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी थोड्याच वेळात सुरुवात होणार असून दुपापर्यंत निकालांचा कल स्पष्ट होईल. मात्र या मतमोजणीच्या पूर्वसंध्येलाच समाजवादी पक्षाने निवडणूक आयोगाला मतमोजणीचं लाइव्ह वेबकास्टींग करण्याची मागणी केलीय. मतमोजणीचं थेट प्रक्षेपण पाहता यावं यासाठी ही मागणी केलीय. समाजवादी पार्टीने या वेबकास्टींगची लिंक सर्व राजकीय पक्षांना देण्यात यावी अशीही मागणी केली. यापूर्वी वाराणसीमधील ईव्हीएम मशीन्सची जागा बदलण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन अखिलेश यादव यांनी प्रश्न उपस्थित करत भाजपावर निवडणुकीच्या मतमोजणीत गडबड करण्याचा आरोप केला होता. याच पार्श्वभूमीवर सपाने या वेबकास्टींगची मागणी केलीय. मात्र निवडणूक आयोगाने हे आरोप फेटाळून लावले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in