उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुसऱ्या टप्प्यामध्ये आज राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाआधी ट्विट करुन गजवा-ए-हिंदचं स्वप्न पाहणाऱ्यांचं स्वप्न कयामतच्या दिवसापर्यंत पूर्ण होणार नाही असं म्हटलंय. एएनआयला दिलेल्या मुलखातीमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली नवीन भारत आकार घेत असल्याचं म्हटलं आहे. या नव्या भारतामध्ये सर्वांचा विकास होईल कोणासोबतही भेदभाव केला जाणार नाही असं योगी म्हणाले आहेत. नवीन भारत संविधानानुसार काम करेल शरीयतप्रमाणे नाही असंही योगी म्हणाले आहेत. हिजाबवरुन देशामध्ये सुरु असणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर योगींनी केलेल्या या वक्तव्यामधून त्यांनी सांकेतिक पद्धतीने विरोधकांना इशारा दिलाय. गजवा-ए-हिंदचं स्वप्न कयामतच्या दिवसापर्यंत पूर्ण होणार नाही, असंही योगी म्हणालेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा