राजकीय दृष्ट्या देशातील सर्वात महत्वाच्या राज्यांपैकी एक असणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये आज दुसऱ्या टप्प्यामधील मतदान सुरु आहे. विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामधील मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झालीय. आज राज्यातील ९ जिल्ह्यांमधील ५५ मतदारसंघासाठी मतदान पार पडत आहे. याच दरम्यान आज सकाळी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. खास करुन समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्यावर योगी आदित्यनाथ यांनी सडकून टीका केलीय. अखिलेश यादव हे दिवसातील १२ तास झोपा काढतात असा टोला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लागवालाय.

आझम खान यांच्यावरुन साधला निशाणा
तुरुंगामध्ये कैद असणारे आझम खान, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्यावर टीका करण्याबरोबरच केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या मुलाला मिळालेला जामीन अशा अनेक विषयांवर भाष्य केलंय. दुसऱ्या टप्प्यातील मतदानामध्ये रामपूरमध्येही मतदान पार पडत असून येथून सपाच्या तिकीटावर आझम खान निवडणूक लढवत आहेत. याच पार्श्वभूमीवर योगींनी अखिलेश यांच्यावर निशाणा साधलाय. आझम खान तरुंगाबाहेर यावेत असं अखिलेश यांनाही वाटत नसल्याचं योगींनी म्हटलं आहे. “ते बाहेर आले तर अखिलेश यांची खुर्ची धोक्यात येईल,” असा दावा योगींनी केलाय. अखिलेश यांनाच या प्रकरणांसंदर्भात विचारलं पाहिजे. आझम खान किंवा अन्य लोकांना जामीन देण्यासंदर्भातील प्रकरणं ही न्यायालयीन आहेत. यामध्ये राज्य सरकारची काहीच भूमिका नसून जामीन देण्याचा अधिकार न्यायालयाला आहे, असंही योगींनी म्हटलंय.

Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा अंधारेंनी केली अमृता फडणवीसांची नक्कल; म्हणाल्या, “ठाकरे मृत्यूशय्येवर असताना…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Eknath Shinde, Vijay Shivtare, Purandar Haveli,
पुरंदर विमानतळ ‘असा’ उभारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा ! विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ घेतली सभा
uddhav Thackeray sawantwadi
“कोकण आणि शिवसेनेचे नाते तोडण्याचा प्रयत्न, कोकणचे अदानीकरण होऊ देणार नाही”, उद्धव ठाकरेंचा इशारा
Deputy Chief Minister Devendra Fadnavis announced that will waive off the loans of farmers after mahayuti govt
“शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
History Of Tipu Sultan
एका रात्रीत ८०० मंड्यम अय्यंगारांची हत्या; ‘नरक चतुर्दशी’ हा दिवस शोकदिवस का ठरला?
nitin gadkari
Nitin Gadkari: ‘भाजपाचं पिक वाढलंय, त्यावरही फवारणी करण्याची गरज’, नितीन गडकरींचा इशारा कुणाकडे?

विकासकामं आमच्या काळात झाली…
अखिलेश यादव यांच्याकडून योगी आदित्यनाथ केवळ वेगवेगळ्या प्रकल्पांचं उद्घाटन करत असल्याची टीका करण्यात आली होती. यावर उत्तर देताना योगी आदित्यनाथ यांनी, “जनतेने यांना उद्घाटन करण्याच्या योग्येतेचंही ठेवलेलं नाहीय,” असा टोला लावलाय. “७० वर्षांमध्ये १२ सरकारी मेडिकल कॉलेज उभारण्यात आले. मागील पाच वर्षांमध्ये ३३ नवीन कॉलेज आम्ही उभारलीयत त्यापैकी १७ कॉलेज सुरु झाली आहेत. ७० वर्षामध्ये दीड एक्सप्रेस वे बनवलाय. आम्ही पाच वर्षांमध्ये ७ नवीन एक्सप्रेस वे तयार केले. अखिलेश यांनी १८ हजार लोकांना घरं मंजूर केली मिळालं एकालाही नाही. मात्र आम्ही ४३ लाख लोकांना घरं दिली आहेत,” असं योगी म्हणाले.

झोपा काढण्यातून वेळ मिळाला तर…
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अखिलेश यादव यांना झोपा काढण्यातून आणि मित्रमंडळींमधून वेळ मिळत नसल्याचा टोला लगावलाय. आम्ही काय विकासकामं केली आहेत हे अखिलेश यांना झोपा काढण्यातून आणि मित्रमंडळींमधून वेळ मिळाला तर समजेल, असा टोला योगी आदित्यनाथ यांनी लगावलाय. “मोठ्या बापाचे पुत्र आहेत ते, १२ तास झोपतात. सहा तास मित्रमंडळींसोबत घालवतात,” असा टोला योगी आदित्यनाथ यांनी लगावलाय. तसेच पुढे बोलताना, “अखिलेश यांच्या कुटुंबाविरोधात मिळकतीपेक्षा अधिक संपत्ती असल्याचं प्रकरण भाजपा सरकारच्या काळातील आहे का? २०१३ मध्ये तर भाजपाचं सरकार नव्हतं. अजूनही बरीच प्रकरण आहेत अशी. ही सारं भाजपाने केलेली आहेत का?,” असा प्रश्न अखिलेश यांना योगींनी विचारलाय. त्याचप्रमाणे, “पाच वर्षांमध्ये ३३ मेडिकल कॉलेज तयार होत आहेत. हे ७० वर्षांमध्ये का झालं नाही. राज्याची कमाई वाढलीय. हा पैसा आधी कुठे जात होता? हाच पैसा त्यांच्या अत्तर व्यापारी असणाऱ्या मित्राकडे जात होता, हे खरं नाहीय का?,” असंही योगींनी पुढे बोलताना म्हटलंय.