Anurag Dubey Case In Supreme Court : गँगस्टर अनुराग दुबे याच्या अटकपूर्व जामिनाच्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारले. यावेळी न्यायालय म्हणाले की, “कदाचित पोलीस आणखी एक गुन्हा दाखल करतील म्हणून आरोपी न्यायालयासमोर हजर होत नसेल. तुम्ही किती गुन्हे दाखल करणार? तुमच्या डीजीपींना सांगा आम्ही असा आदेश जारी करू की, ते आयुष्यभरासाठी लक्षात ठेवतील.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी काय म्हटलं?

या प्रकरणाच्या सुनावणी वेळी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्यायमूर्ती म्हणाले की, “खरेदी खत झाल्यानंतरही तुम्ही जमीन हडपल्याची भाषा करत आहात. आजकाल सर्वकाही डिजिटल पद्धतीने होत असताना, तुम्ही थेट समन्स कसे पाठवू शकता. अनुराग दुबेला त्याचा मोबाइल फोन कायम चालू ठेवायला आणि चौकशीत सहकार्य करायला सांगितले आहे. त्यामुळे न्यायालयाच्या परवानगीशिवाय त्याचा ताबा घेता येणार नाही.” यानंतर न्यायालयाने पोलिसांनी केलेल्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत पोलिसांनी संवेदनशीलता दाखविण्याची गरज असल्याचे सांगितले.

आरोपी दुबेला अटक न करण्याचा इशारा देत न्यायमूर्ती कांत म्हणाले, “त्याला तपासात सहभागी होऊ द्या पण अटक करू नका. जर तुम्हाला वाटत असेल की एखाद्या विशिष्ट प्रकरणात अटक करणे आवश्यक आहे, तर आम्हाला त्याची कारणे सांगा.”

उत्तर प्रदेश सरकारची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील राणा मुखर्जी यांनी सांगितले की, “न्यायालयाच्या मागच्या आदेशानंतर याचिकाकर्त्याला नोटीस पाठवण्यात आली होती. परंतु तो तपास अधिकाऱ्यासमोर हजर झाला नाही. त्याने उलट प्रतिज्ञापत्र पाठवले. यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती कांत यांनी टिपणी केली की, “याचिकाकर्त्याला कदाचित यूपी पोलिस त्याच्यावर आणखी एक खोटा गुन्हा दाखल करेल याची भीती आहे.”

“आरपी समोर येत नसेल कारण, त्याला माहित आहे की तुम्ही त्याच्यावर आणखी एक खोटा गुन्हा नोंदवून त्याला अटक कराल. तुमच्या डीजीपींना सांगा ज्या क्षणी आरोपीला स्पर्श करात त्या क्षणी, आम्ही असा कठोर आदेश देऊ की तो त्यांना आयुष्यभर लक्षात राहील.”

सर्वोच्च न्यायालय

हे ही वाचा : पराभूत उमेदवारांबरोबर राज ठाकरेंनी घेतलेल्या बैठकीत काय ठरलं? EVM बाबत भूमिका काय? पदाधिकारी म्हणाले…

काय आहे प्रकरण?

गँगस्टर अनुराग दुबे याच्यासह सहआरोपी करण्यात आलेल्या विनय दुबेची सुमारे अडीच कोटी रुपयांची मालमत्ता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी एकूण १० जणांची चौकशी सुरू आहे. या दहा जणांवर अनुपम दुबे आणि त्याचा भाऊ अनुराग दुबे यांच्यासोबत आर्थिक आणि भौतिक फायद्यासाठी असामाजिक काम केल्याचा आरोप आहे. भीतीपोटी त्यांच्याविरुद्ध कोणीही साक्ष किंवा माहिती देत नाही.

तपास अधिकारी बलराज भाटी यांनी आरोपी विनय दुबे याची बेकायदेशीर जंगम व जंगम मालमत्ता जप्त करण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी न्यायालयात अर्ज दिला होता.

मराठीतील सर्व उत्तर प्रदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supreme court slams up police anurag dubey case aam