उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. काँग्रेस, सपा, बसपासारख्या पक्षांनी निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपने पुन्हा सत्ता काबीज करण्याचा विश्वास व्यक्त केलाय. आज (३ फेब्रुवारी २०२२) उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याची निवडणूक पार पडत आहे. यामध्ये एकूण ५७ जागांसाठी मतदान होत आहे. दरम्यान यावेळी उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री तथा भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर येथे मदतानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी भाजप पूर्ण बहुमताने निडणूक जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला.

उत्तर प्रदेशमध्ये आज विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. यामध्ये एकूण ५७ जागांसाठी मतदान होत असून तब्बल ६७६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पूर्वांचलमधील आंबेडकर नगर ते गोरखपूर या भागातील एकूण दहा जिल्ह्यांमध्ये आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीदेखील आज गोरखपूर येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. ते गोरखपूर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे आजच्या सहाव्या टप्प्यातील मतदानाला विशेष महत्त्व आले आहे.

Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Underground sewage Scheme , Sulabha Khodke ,
अमरावती : आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली… ‘हे’ आहे कारण
डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP vs Congress : डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं?
minister Sanjay rathod
“मृद व जलसंधारण विभागात तीन हजार पदे भरणार”, मंत्री संजय राठोड यांची घोषणा; पालकमंत्रिपदाबाबत म्हणाले…
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “२०१९ मध्ये मोठी गद्दारी…”
Important update regarding municipal elections in Maharashtra state
राज्यातील महापालिका निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट, बावनकुळे म्हणाले…
Public Works Minister Shivendra Raje, Satara Shivendra Raje,
साताऱ्यातील आम्ही चारही मंत्री एकत्रितपणे जिल्ह्याचा विकास करू, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजेंचा विश्वास

योगी आदित्यनाथ यांनी आपला मदतानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपाचाच विजय होईल असा दावा केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली यावेळी भाजप विक्रमी कामगिरी करेल. भाजप सहाव्या टप्प्यातील अनेक जागा जिंकून एकूण ३०० जागा जिंकण्याच्या लक्ष्याकडे मार्गक्रमण करेल,” असे योगी आदित्यनाथ म्हणाले. तसेच सहव्या टप्प्यातील एकूण जागांपैकी ८० टक्के जागा भाजपा जिंकेल असेही योगी आदित्यनाथ म्हणाले.

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये मतदानाचे आतापर्यंत एकूण पाच टप्पे पार पडले आहेत. या पाच टप्प्यांत २९२ जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडलीय. तर सहाव्या टप्प्यासाठी मतदान होत असलेल्या ५७ मतदारसंघांपैकी ११ जागा राखीव आहेत. योगी आदित्यानाथ लढत असलेला गोरखपूर मतदारसंघासाठीही आजच मतदान होत आहे. योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात आझाद समाज पक्षाचे चंद्रशेखर आझाद यांनीही याच मतदारसंघातून दंड थोपटले आहेत. त्यामुळे सहाव्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

आणखी वाचा >> UP Assembly Election 2022 : सत्तेचा मार्ग ‘बसप’च्या कुंपणातून ?

आणखी वाचा >> ‘आमचा विरोध भाजपला नव्हे, योगींना!’ ; आदित्यनाथ यांच्या राजवटीत आर्थिक नाकेबंदी झाल्याचा नाराज ब्राह्मण नेत्यांचा आरोप

Story img Loader