Uttarakhand, Goa, Manipur, Punjab Assembly Election Live Updates: पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये चुरशीने लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली आहे. आज दुपारपर्यंत सर्वच राज्यातील निकालांचा कल स्पष्ट होईल. त्यामुळे कोणता पक्ष कोणत्या राज्यात सत्ता स्थापन करण्यात यशस्वी ठरतो हे पाहणं महत्वाचं ठरेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पंजाबमध्ये गेले काही महिने मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा, नंतर चरणजित सिंग चन्नी मुख्यमंत्री झाले आणि अमरिंदर सिंग यांनी वेगळा पक्ष काढत भाजपासोबत हातमिळवणी केली. तर, आम आदमी पक्षाने पंजाबमधील निडवणूक चुरशीची केली होती. त्यामुळे आपला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, गोवा, उत्तराखंड व मणिपूर या तीनही राज्यांमध्ये काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षांमध्ये सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरण्यासाठी चढाओढ असेल. एग्झिट पोलमध्ये उत्तराखंड व गोवा या दोन राज्यांमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता नसल्याचा अंदाज व्यक्त केलेला नाही.
Assembly Election 2022 Results Live News Updates : पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यांमध्ये कोणते पक्ष सत्ता स्थापन करतील हे पाहणं महत्वाचं असेल.
गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपाने २० जागांवर विजय मिळवला आहे. मगोप आणि तीन अपक्ष आमदारांनी देखील आम्हाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भक्कम बहुमतासह आम्ही सरकार स्थापन करू असं गोव्याचे भाजपा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले.
गोव्यात भाजपा पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे २० आमदार विजयी झाले आहेत, तर मगोप कडूनही भाजपाला पाठिंबा देण्यात आलेला आहे.
गोव्यात गुरुवारी आम आदमी पार्टीचे (आप) मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार अमित पालेकर यांचा काँग्रेसकडून पराभव झाला. काँग्रेसने ही जागा भाजपाकडून हिसकावून घेतली आहे. निवडणूक आयोगाने आतापर्यंत जाहीर केलेल्या निवडणूक निकालांनुसार, अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आप ने गोव्यात एका जागेवर विजय मिळवला आहे आणि दुसऱ्या जागेवर आघाडीवर आहे.
पंजाबमधील पराभवानंतर काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, काँग्रेसने चरणजित सिंग चन्नी यांच्या रूपाने नवे नेतृत्व सादर केले होते, जे मैदानात उतरले होते. पण कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या साडेचारवर्षांच्या सत्ताविरोधी लाटेवर मात करता आली नाही आणि त्यामुळे लोकांनी परिवर्तनासाठी 'आप'ला मतदान केले.
पणजी आणि तळेगाव मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार अतानासिओ मोन्सेरात आणि त्यांची पत्नी जेनिफर मोन्सेरात विजयी झाले आहेत. वालपोई आणि पोरीम विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विश्वजित राणे आणि त्यांच्या पत्नी देविया विश्वजित राणे विजयी झाले आहेत.
“लोकांचा निर्णय नम्रपणे स्वीकारा”, अशी प्रतिक्रिया पाचही राज्यात पक्षाचा पराभव झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिली.
Humbly accept the people’s verdict. Best wishes to those who have won the mandate.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 10, 2022
My gratitude to all Congress workers and volunteers for their hard work and dedication.
We will learn from this and keep working for the interests of the people of India.
'गोव्यात प्रमोद सावंत पुन्हा मुख्यमंत्री होणार का?', असा प्रश्न विचारला असता “मला माहीत नाही, हा एक संवेदनशील प्रश्न आहे,”असं भाजपा नेते विश्वजित राणे म्हणाले.
#goaelections | “I don't know, it's a sensitive question,” says BJP leader Vishwajit Rane on being asked if Pramod Sawant will continue as the CM. pic.twitter.com/YW54qPvEen
— ANI (@ANI) March 10, 2022
“'पंजाब वालो तुस्सी कमाल कर दित्ता', आम्ही सर्व तुमच्यावर प्रेम करतो. यावेळी पंजाबच्या निकालांनी क्रांती घडवून आणली आहे, अनेक मोठ्या लोकांना हादरे देत तुम्ही खुर्चीवरून खाली उतरवलं,” असं अरविंद केजरीवाल म्हणाले.
पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांचा अमृतसर पूर्व मतदारसंघातून ६,७५० मतांनी पराभव झाला.
Punjab Congress chief Navjot Singh Sidhu loses from Amritsar East by a margin of 6,750 votes.#punjabelections2022 pic.twitter.com/mtsmt8JYxk
— ANI (@ANI) March 10, 2022
आज कॅप्टन अमरिंदर सिंग, प्रकाशसिंग बादल, मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी, नवज्योत सिंग सिद्धू, विक्रमजित सिंग मजीठिया हारले, आज पंजाबच्या जनेतेनं खूप मोठं काम केलंय, असं अरविंद केजरीवाल म्हणाले. मी दहशतवादी नाही, मी देशभक्त आहे, हे आज पंजाबच्या जनतेनं सिद्ध केलंय, असं केजरीवाल यांनी म्हटलं.
भाजपाने गोव्यात ५ जागा जिंकल्या असून १५ जागांवर आघाडीवर आहेत. पणजीच्या भाजपा कार्यालयात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा जल्लोष पाहायला मिळाला. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत देखील उपस्थित होते.
Celebrations at BJP office in Panaji following official EC trends for #goaelections2022
— ANI (@ANI) March 10, 2022
As per the latest trends, BJP has won 5 and is leading on 15 so far. pic.twitter.com/JK27eRuhla
“कोणत्याही सरकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांचे फोटो नसतील. कार्यालयांमध्ये केवळ शहीद भगतसिंग आणि बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो असतील,” अशी घोषणा भगवंत मान यांनी केली आहे.
No government office will have CM's photos, there will be pictures of Shaheed Bhagat Singh and Babasaheb Ambedkar: AAP's Bhagwant Mann, at Sangrur
— ANI (@ANI) March 10, 2022
“मी राजभवनात नव्हे तर भगतसिंगांच्या खटकरकलन गावात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेईन,” अशी घोषणा आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांनी संगरूर येथे केली.
#punjabelections2022 | I will take oath as the CM in Bhagat Singh's village Khatkarkalan, not at the Raj Bhawan: AAP's Bhagwant Mann, at Sangrur pic.twitter.com/u5yA5XsDPh
— ANI (@ANI) March 10, 2022
अधिकृत ट्रेंडनुसार मणिपूर राज्यात भाजपा आघाडीवर असल्याने मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या इम्फाळ येथील निवासस्थानी जल्लोष साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री एन बिरेन सिंग हेनगांगमध्ये १८ हजार २७१ मतांनी आघाडीवर आहेत.
#watch | Celebrations at the residence of Manipur CM N Biren Singh in Imphal as BJP leads in the state as per official EC trends. CM N Biren Singh leading in Heingang by 18,271 votes. pic.twitter.com/4AUbchWfAm
— ANI (@ANI) March 10, 2022
पंजाब निवडणुकीत आम आदमी पक्षाचा विजय झाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यासह मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांनी दिल्लीतील हनुमान मंदिरात प्रार्थना केली.
Delhi CM and Aam Aadmi Party leader Arvind Kejriwal along with Manish Sisodia and Satyendar Jain offers prayers at Hanuman Temple in Delhi, as AAP sweeps Punjab elections pic.twitter.com/nutoWXwefS
— ANI (@ANI) March 10, 2022
माजी मुख्यमंत्री आणि पंजाबचे लोक काँग्रेसचे संस्थापक कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पटियालामधून १९,८७३ मतांनी पराभव झाला.
Former CM and Punjab Lok Congress founder, Captain Amarinder Singh loses from Patiala by a margin of 19,873 votes.
— ANI (@ANI) March 10, 2022
(File photo)#punjabelections2022 pic.twitter.com/9O3CSSFVLF
“पंजाबमध्ये काँग्रेसची परिस्थिती चांगली होती. पण तिथे तीन चार महिन्यांमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाचा स्विकार पंजाबच्या जनतेने केला नाही. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना हटवून काँग्रेसची चूक झाली. दिल्लीत जे आंदोलन झालं, त्यात पंजाबचा फार मोठा भाग सहभाग होता. शेतकरी आंदोलनाचा स्पष्ट परिणाम झालेला दिसतोय. म्हणून लोकांनी भाजपा- काँग्रेसला नाकारत 'आप'ला सत्ता दिली. काँग्रेस कुठं कमी पडली, याबद्दल मी बोलणार नाही,” असंही पवार म्हणाले.
आपचे मुख्यमंत्री उमेदवार भगवंत मान यांनी पक्षाच्या विजयावर कार्यकर्त्यांचे आणि समर्थकांचे संगरूर येथील निवासस्थानी स्वागत केले. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, भगवंत मान धुरीमधून ५५ हजार मतांनी आघाडीवर आहेत.
#watch | AAP CM candidate Bhagwant Mann greets party workers and supporters at his residence in Sangrur as the party sweeps #punjabelections2022. Mann is leading from Dhuri by over 55,000 votes as per official EC trends. pic.twitter.com/UMsbUgoyiH
— ANI (@ANI) March 10, 2022
कॅप्टन अमरिंदर सिंग पराभूत झाले आहेत. प्रतिक्रिया देत ते म्हणाले, “मी जनतेचा निर्णय नम्रतेने स्वीकारतो. पंजाबींनी सांप्रदायिक आणि जातीय रेषेच्या वर उठून आणि मतदान करून पंजाबीयतेचा खरा आत्मा दाखवला आहे.”
Capt Amarinder Singh says “I accept the verdict of the people with all humility. Punjabis have shown true spirit of Punjabiyat by rising and voting above sectarian and caste lines.” pic.twitter.com/wo79r4EsAZ
— ANI (@ANI) March 10, 2022
गोव्याच्या बिचोलीम मतदारसंघातील अपक्ष उमेदवार डॉ.चंद्रकांत शेट्ये यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे.
“गोव्यात 'आप'ने दोन जागा जिंकल्या. कॅप्टन वेंझी आणि एर क्रूझ यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. गोव्यातील प्रामाणिक राजकारणाची ही सुरुवात आहे,” अशी प्रतिक्रिया गोवा निकालांवर अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.
AAP wins two seats in Goa. Congratulations and best wishes to Capt Venzy and Er Cruz. Its the beginning of honest politics in Goa
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) March 10, 2022
“गोव्यात आम्ही जिंकू, असे वाटले होते, पण आम्हाला जनतेचा जनादेश स्वीकारावा लागेल. आम्हाला १२ जागा मिळाल्या आहेत, तर भाजपला १८ जागा मिळाल्या आहेत. विरोधी पक्ष म्हणून आम्ही चांगलं काम करू. लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी काँग्रेसला कठोर परिश्रम करावे लागतील,” असं काँग्रेस नेते मायकल लोबो म्हणाले.
“लोकांचा आवाज हा देवाचा आवाज आहे…. पंजाबच्या जनतेचा जनादेश नम्रपणे स्वीकारा…. 'आप'चे अभिनंदन!!!”, असं सिद्धूंनी म्हटलंय
राज्यात सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते आज गोव्याचे राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई यांची भेट घेणार आहेत.
#goaelections2022 | Bharatiya Janata Party leaders to meet Goa Governor P.S.Sreedharan Pillai today to stake claim for government formation in the state
— ANI (@ANI) March 10, 2022
लालकुवामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री हरीश रावत १० हजार मतांनी पिछाडीवर आहेत.
पणजी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार आणि दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांचा ८०० मतांनी पराभव झाला आहे, असं वृत्त एबीपी माझाने दिलंय.
पणजी मतदार संघातून अपक्ष उमेदवार उत्पल पर्रिकर ७०० मतांनी पिछाडीवर आहेत. आपण भाजपाला चांगली टक्कर देत असून निकालांवर लक्ष ठेवून आहे, अशी प्रतिक्रिया उत्पल पर्रिकर यांनी दिली.
भाजपाने उत्तराखंडमध्ये बहुमताचा आकडा पार केला आहे. सध्या भाजपा ४४ जागांवर आघाडीवर आहे. उत्तराखंडच्या सर्व ७० जागांसाठी अधिकृत ट्रेंड समोर आले असून काँग्रेस २२ जागांवर आघाडीवर आहे.
BJP comfortably crosses the majority mark, now leads on 44; Congress leads on 22 as official trends for all 70 seats for #uttarakhandelections2022 come out. pic.twitter.com/OujAVD1cKc
— ANI (@ANI) March 10, 2022
“पंजाबमध्ये काँग्रेस सरकार स्थापन करेल अशी आम्हाला अपेक्षा होती, पण आम्हाला अपेक्षित संख्याबळ मिळाले नाही. त्याबद्दल आत्मपरीक्षण करायला हवे. गोव्यात काँग्रेस १६-१७ जागांवर आघाडीवर आहे, तो सर्वात मोठा पक्ष असेल आणि संख्याबळ पुरेसं नसेल तर आम्ही
दुसऱ्या पक्षांचा पाठिंबा घेऊ,” अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी दिली.
We expected Congress to form govt in Punjab, but we didn't get required numbers. We have to introspect about it. In Goa, Congress is leading on 16-17 seats, it'll be the single largest party & we'll seek support in case numbers aren't enough: Maha min & Cong leader Satej Patil pic.twitter.com/8ficWAw6JA
— ANI (@ANI) March 10, 2022
गोव्याची ही निवडणूक आम्हीच जिंकू. लोकांनी घोटाळेबाजांना, बाहेरच्या लोकांना नाकारले आहे. त्यांनी गोव्यातील जनतेसाठी काम करणाऱ्या पक्षाला मतदान केले आहे, असं भाजपा नेते विश्वजित राणे म्हणाले. प्रमोद सावंतांच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय पक्ष नेतृत्व घेईल, असंही त्यांनी सांगितलं.
#goaelections | We will sweep this Goa election. People have rejected scamsters, outsiders. They have voted for a party that works for the people of Goa: BJP leader Vishwajit Rane
— ANI (@ANI) March 10, 2022
“Party leadership will decide,” he says, on being asked if Pramod Sawant will continue as the CM. pic.twitter.com/C7bJ4NErfD
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला काँग्रेसपेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गोवा, उत्तराखंड व मणिपूर या तीनही राज्यांमध्ये काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षांमध्ये सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरण्यासाठी चढाओढ असेल. एग्झिट पोलमध्ये उत्तराखंड व गोवा या दोन राज्यांमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता नसल्याचा अंदाज व्यक्त केल्यामुळे काँग्रेसने गेल्या वेळी झालेला गलथानपणा टाळण्याची दक्षता घेतली आहे. २०१७ मध्ये गोव्यात काँग्रेसला सर्वाधिक १७ जागा असतानाही तिथे भाजप सरकार बनवण्यात यशस्वी झाला होता. मणिपूरमध्येही भाजपने सत्ता स्थापनेत काँग्रेसवर मात केली होती.