Vasai Vidhan Sabha Election 2024 निवडणुकीच्या आदल्या दिवशी विनोद तावडे हे विरारच्या विवांता हॉटेलमध्ये होते. त्यांनी पैसे वाटप केल्याचा कथित आरोप बविआचे हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांनी केला. याचा काहीही परिणाम झालेला नाही हे निकालाच्या दिवशी स्पष्ट झालं आहे. कारण वसईत भाजपाच्या स्नेहा पंडीत विजयी ३१०० हून अधिक मतांनी झाल्या आहेत. वसई विधानसभा मतदारसंघ – १३३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, वसई मतदारसंघात पालघर जिल्ह्याच्या वसई तालुक्यातील आगाशी, वसई, माणिकपूर ही महसूल मंडळे नवघर माणिकपूर नगरपालिका, वसई नगरपालिका आणि सन डोअर सीटी यांचा समावेश होतो. वसई हा विधानसभा मतदारसंघ पालघर लोकसभा मतदारसंघात मोडतो. वसईतून काँग्रेसने विजय पाटील यांना तिकिट दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२००९ मध्ये काय होतं बलाबल?

वसई विधानसभा मतदारसंघातून २००९ ला विवेक पंडीत निवडून आले होते. त्यांनी बविआच्या नारायण मानकर यांचा पराभव केला होता. विवेक पंडीत अपक्ष लढले आणि त्यांना ८१ हजार ३५८ मतं मिळाली.

२०१४ पासून परिस्थिती बदलली

वसईतील परिस्थिती २०१४ पासून बदलली. कारण हितेंद्र ठाकूर हे या मतदारसंघातून आमदार झाले. त्यांना २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ९७ हजार २९१ मतं मिळाली. त्यांनी विवेक पंडीत यांचा पराभव केला.

२०१९ मध्ये काय स्थिती होती?

२०१९ मध्ये बविआचे हितेंद्र ठाकूर पुन्हा एकदा निवडून आले. त्यांना १ लाख २ हजार ९५० मतं मिळाली. तर त्यांनी शिवसेनेच्या विजय पाटील यांचा पराभव केला.

वसई हे पालघर जिल्ह्यात असलेलं मुंबईचं उपनगर

वसई हे भारतातील मुंबई शहराचे पालघर जिल्ह्यात असलेले एक उपनगर आहे. याला जवळचे रेल्वे स्थानक हे वसई रोड आहे. वसई शहर हे आधुनिक वसई-विरार महापालिकेत येते. रेल्वे स्थानक असलेल्या भागाचे नाव नवघर आहे.

वसई मध्ये कुठली गावं येतात?

वसई या शहरात पापडी, बाभोळा, देवतलाव, गिरिज, हिराडोंगरी, गास, भूईगाव, रानगाव, रमेदी, होळी अशी अनेक गावे येतात या शहराजवळ नायगाव आणि वसई ही दोन रेल्वे स्थानके आहेत. या शहरात हिंदू आणि ख्रिस्ती ह्या धर्मीय समाज हा अधिक आहे तसेच इतर धर्मीय देखील इथे बऱ्याच प्रमाणात आहेत. वसई हा तालुका देखील आहे. पूर्वी तो ठाणे जिल्ह्यात येत असे. आता तो पालघर जिल्ह्याचा भाग आहे. या तालुक्यात नायगाव, नालासोपारा, विरार, जुचंद्र आणि कामण रोड ही अन्य पाच रेल्वे स्थानकं देखील आहेत. हे शहर मुंबईजवळचे शहर आहे. वसईची सुकेळी ही फार प्रसिद्ध होती. तशी ती आजही प्रसिद्ध आहेत पण कालांतराने या भागातील बागा कमी झाल्या आहेत.

वसईच्या किल्ल्याचं महत्त्व

पोर्तुगीजांनी येथे अरबी समुद्रालगत आरमारी किल्ला बांधला. सन १७३७ मध्ये थोरले बाजीराव पेशव्यांचे बंधू व सेनापती चिमाजी अप्पा यांनी वसई आणि साष्टी प्रांतावर केले व १७३९ मध्ये वसईचा किल्ला पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला व मराठ्यांच्या राज्यास जोडला.

वसईच्या रहिवाशांना मराठीत वसईकर म्हणतात, ज्यामध्ये कर प्रत्यय म्हणजे ‘रहिवासी’. बसेनचे वसई असे अधिकृत नामकरण झाल्यापासून हा शब्द वापरला जात होता. महाराष्ट्र राज्याबाहेर तसेच भारताबाहेरील वसईकर डायस्पोरा, त्यांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाल्यामुळे आणि वसई हे मुंबई महानगर प्रदेशात, उपनगरी मुंबईच्या काठावर वसलेले असल्यामुळे ते स्वतःला मुंबईचे म्हणून संबोधतात.

वसईचा पूर्व भाग औद्योगिक

वसईचा पूर्वेकडील भाग मोठ्या प्रमाणात औद्योगिक आहे, ज्यामध्ये लहान आणि मध्यम स्तरावरील युनिट्स विविध प्रकारच्या वस्तूंचे उत्पादन करतात. अधिक परवडणारी घरे आणि मुंबईच्या जवळ असलेल्या वसईने १९८० पासून उच्च लोकसंख्या वाढीचा दर राखला आहे. यामुळे पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकासात जलद सुधारणा झाली आहे.