Vidarbha Assembly Election Result Live: राज्यात बुधवारी (२० नोव्हेंबर) रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले. आज (२३ नोव्हेंबर रोजी) मतमोजणी होत आहे. विदर्भात एकूण ६२ मतदारसंघ आहेत. या ६२ मतदारसंघात जनतेचा कौल कुणाला मिळणार? विदर्भात महायुती बाजी मारणार की महाविकासआघाडी? हे आज मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Vidarbha Assembly Election Results Live Updates : विदर्भातील ६२ मतदारसंघातील घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.

06:09 (IST) 23 Nov 2024

Nagpur Vidhan Sabha Result Latest Updates : दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातही मतांची टक्केवारी वाढली

नागपूर जिल्ह्यातील इतर मतदारसंघाप्रमाणे दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातही मतांची टक्केवारी वाढली आहे. पुरुषांपेक्षा अधिक महिला असलेल्या या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीपेक्षा यावेळी १४ हजारांहून अधिक महिलांनी मतदान केले. ही वाढलेली मते कोणाच्या पारड्यात जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत झाली.

05:04 (IST) 23 Nov 2024

Nagpur Vidhan Sabha Election Result Live Updates : जय-पराजयातील फरकाची मते वाढविण्‍यात ‘नोटा’चा ही हातभार

गेल्‍या विधानसभा निवडणुकीत पश्चिम विदर्भातील ३० पैकी १४ मतदारसंघांमध्‍ये ‘नोटा’ला (वरीलपैकी कोणीही नाही) चौथ्‍या आणि पाचव्‍या क्रमांकाची मते मिळाली. जय-पराजयातील फरकाची मते वाढविण्‍यात ‘नोटा’चा ही हातभार लागला. त्‍यामुळे यावेळी ‘नोटा’चा काय परिणाम पडू शकतो, याची चर्चा रंगली आहे.

03:57 (IST) 23 Nov 2024

Vidarbha Vidhan Sabha Result Live Updates: दलित मताचा मुद्दा प्रभावी ठरणार

भाजपने हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरणासाठी ‘कटेंगे-बटेंगे’चा मुद्दा प्रचारात आणला, पण पश्चिम विदर्भातील काही मतदारसंघ वगळता इतर ठिकाणी तो फारसा प्रभावी ठरला नाही. लोकसभेप्रमाणेच याही निवडणुकीत दलित मताचा मुद्दा प्रभावी ठरणार आहे.

03:06 (IST) 23 Nov 2024
Vidarbha Vidhan Sabha Election Result : २०१९ च्या निवडणुकीच्या तुलनेत

विदर्भातील ६२ पैकी ४२ मतदारसंघांत मतदानाचा टक्का २०१९ च्या निवडणुकीच्या तुलनेत वाढल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येते.

02:12 (IST) 23 Nov 2024

Vidarbha Vidhan Sabha Election 2024 Result Live Updates : काही गावांनी मतदानावर बहिष्कार घातला.

काही गावांनी नागरी सुविधांच्या मुद्यावर मतदानावर बहिष्कार घातला.

01:19 (IST) 23 Nov 2024

विदर्भात महायुती की महाविकास आघाडी?

विदर्भात एकूण ६२ मतदारसंघ आहेत. या ६२ मतदारसंघात जनतेचा कौल कुणाला मिळणार? विदर्भात महायुती बाजी मारणार की महाविकासआघाडी? हे आज मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.

विदर्भ विधानसभा निवडणूक २०२४ लाईव्ह निकाल अपडेट्स