Vidarbha Assembly Election Result Highlights: राज्यात बुधवारी (२० नोव्हेंबर) रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले. आज (२३ नोव्हेंबर रोजी) मतमोजणी होत आहे. विदर्भात एकूण ६२ मतदारसंघ आहेत. या ६२ मतदारसंघात जनतेचा कौल कुणाला मिळणार? विदर्भात महायुती बाजी मारणार की महाविकासआघाडी? हे आज मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Vidarbha Assembly Election Results Live Updates : विदर्भातील ६२ मतदारसंघातील घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.

09:35 (IST) 24 Nov 2024

Vidarbha Assembly Election Result: विदर्भात महायुतीची लाट, विरोधक भुईसपाट

विदर्भावरील राजकीय वर्चस्वासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती व काँग्रेसच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीमध्ये अटीतटीचा सामना झाला. परंतु, महायुतीच्या प्रचंड लाटेत महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला. या विदर्भातील ६२ पैकी तब्बल ४८ जागांवर महायुतीने बाजी मारली. लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन करणाऱ्या महाविकास आघाडीला फक्त १३ जागांवरच समाधान मानावे लागले. सविस्तर बातमी वाचा

06:49 (IST) 24 Nov 2024

Vidarbha Vidhan Sabha Result LIve Updates : टीका करणाऱ्यांचेच पानिपत झाले, फडणवीस यांचे विरोधकांना प्रत्युत्तर

नागपूरसह महाराष्ट्रात आमचे पानिपत होणार अशी टीका करणाऱ्यांचेच पानिपत झाले. जनतेने त्यांना नाकारले व आम्हाला आशीर्वाद दिला. राज्यात महायुतीचे सरकार आल्यामुळे आता आमची जबाबदारी वाढली आहे, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

06:44 (IST) 24 Nov 2024

Vidarbha Vidhan Sabha Election Live News: आशीष देशमुखांचा केदारांना धक्का, मेघेंनी हिंगण्याचा गड राखला

सर्वांचे लक्ष लागलेल्या सावनेर मतदारसंघातील लढतीत भाजपचे आशीष देशमुख यांनी त्यांचे पारंपरिक राजकीय विरोधक सुनील केदार यांना धक्का देत विजय मिळवला. त्यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी अनुजा सुनील केदार यांचा पराभव केला.

आशीष देशमुख यांना १ लाख ६९ हजार ७२५ तर अनुजा केदार यांना ८१,२७५ मते मिळाली. देशमुख यांचा २६ हजार ४०१ मतांनी विजय झाला. वारंवार मतदारसंघ बदलत असल्याने त्यांना ही निवडणूक जड जाईल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र देशमुख यांनी एकहाती प्रचार करत बाजी मारली. सावनेरचा पराभव काँग्रेस नेते सुनील केदार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

06:30 (IST) 24 Nov 2024

Vidarbha Vidhan Sabha Result Live Updates : महायुतीच्या झोळीत भरभरून मतांचे दान

पूर्व विदर्भात ३२ तर पश्चिम विदर्भात ३० अशा एकूण ६२ जागा असलेल्या विदर्भात लोकसभेप्रमाणेच निवडणुकीचे निकाल लागतील, असा अंदाज वर्तवला जात होता. लाडकी बहीण योजनेच्या प्रभावामुळे काही उलटफेर होतील, पण ते मर्यदित स्वरूपात असतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पण, मतदारांनी ते साफ खोटे ठरवत महायुतीच्या झोळीत भरभरून मतांचे दान टाकल्याचे निकालातून स्पष्ट होते. ६२ पैकी ४८ जागा महायुतीला मिळाल्या. भाजपने ४७ जागा लढवल्या व ३७ जिंकल्या, शिवसेनेने सातपैकी चार, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने सहापैकी सर्व सहा जिंकल्या.

03:39 (IST) 24 Nov 2024

Vidarbha Assembly Election Results Live Updates : प्रमुख पराभूत उमेदवार

प्रमुख पराभूत उमेदवार

●बच्चू कडू (प्रहार-अचलपूर)

●यशोमती ठाकूर (काँग्रेस-तिवसा)

●राजेंद्र शिंगणे (शरद पवार-सिं.राजा)

●अनुजा सुनील केदार (काँग्रेस-सावनेर)

●सलील अनिल देशमुख (काटोल-शरद पवार)

02:18 (IST) 24 Nov 2024

Vidarbha Vidhan Sabha Result Winning Candidates : प्रमुख विजयी उमेदवार

●देवेंद्र फडणवीस (द. पश्चिम- भाजप)

●चंद्रशेखर बावनकुळे (कामठी-भाजप)

●धर्मरावबाबा आत्राम ( अहेरी-अजित पवार)

●संजय राठोड (दिग्रस-शिवसेना)

●सुधीर मुनगंटीवार (बल्लारपूर-भाजप)

●विजय वडेट्टीवार (ब्रम्हपुरी-काँग्रेस)

●नाना पटोले (साकोली-काँग्रेस)

01:26 (IST) 24 Nov 2024

Vidarbha Vidhan Sabha Result Live Updates : विदर्भात महायुतीच्या प्रचंड लाटेत महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला

विदर्भावरील राजकीय वर्चस्वासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती व काँग्रेसच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीमध्ये अटीतटीचा सामना झाला. परंतु, महायुतीच्या प्रचंड लाटेत महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला. विदर्भातील ६२ पैकी तब्बल ४८ जागांवर महायुतीने बाजी मारली. लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन करणाऱ्या महाविकास आघाडीला फक्त १३ जागांवरच समाधान मानावे लागले.

00:14 (IST) 24 Nov 2024

Vidarbha Assembly Election 2024 Result Live Updates : फडणवीस सहाव्यांदा, मुनगंटीवार सातव्यांदा विजयी

संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चौथ्यांदा तर एकूण सलग सहाव्यांदा निवडणूक जिंकले. या निवडणुकीत त्यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेसचे प्रफुल गुडधे पाटील यांचा ३९ हजार मतांनी पराभव केला.

00:12 (IST) 24 Nov 2024

Vidarbha Vidhan Sabha Result Ajit Pawar NCP : अजित पवार गटाची कामगिरी सरस

२०१९ च्या निवडणुकीत एकसंध राष्ट्रवादीला ६ जागा मिळाल्या होत्या. या वेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने १२ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने सहा जागा लढवल्या होत्या. पण शरद पवार यांच्या पक्षाला खातेही उघडता आले नाही. अजित पवार गटाने मात्र लढवलेल्या सर्व सहा जागा जिंकल्या.

00:11 (IST) 24 Nov 2024

Vidarbha Vidhan Sabha Result Live Updates : पश्चिम विदर्भात काँग्रेसला धक्का

पश्चिम विदर्भात गेल्या निवडणुकीप्रमाणेच भाजपने आपले स्थान अधिक भक्कम केले. काँग्रेसला मोठा फटका बसला. काँग्रेसला गेल्या निवडणुकीत ५ जागा मिळाल्या होत्या. या वेळी केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागेल.

19:45 (IST) 23 Nov 2024

नाना पटोले यांचा पराभव

साकोली मतदारसंघात काँग्रेस नेते नाना पटोले यांचा ६५८ मतांनी पराभव झाला आहे. याठिकाणी भाजपाचे अविनाश ब्राह्मणकर यांचा विजय झाला.

17:02 (IST) 23 Nov 2024

चिमूर क्रांतीभूमित मोदी जिंकले, राहुल हरल्याची चर्चा

चंद्रपूर : भाजपचे भांगडीया १० हजार १७१ मतांनी विजयी झाल्याने क्रांतीभूमित मोदी जिंकले, गांधी हरले अशी चर्चा सुरू झाली आहे.

सविस्तर वाचा…

16:16 (IST) 23 Nov 2024

Assembly Election Results 2024 : अकोला पूर्वमध्ये भाजपचे रणधीर सावरकर यांची हॅट्ट्रिक, ५० हजारांवर मताधिक्यासह दणदणीत विजय

अकोला जिल्ह्यातील अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपचे रणधीर सावरकर यांनी हॅट्ट्रिक साधली आहे. ५० हजारावर मताधिक्य मिळवत त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचा दारुण पराभव केला. रणधीर सावरकर यांनी विक्रमी एक लाख सात हजारावर मते मिळवली आहेत.

वाचा सविस्तर…

15:40 (IST) 23 Nov 2024

मुख्यमंत्री शिंदे यांचे निकटवर्तीय नरेंद्र भोंडेकर तिसऱ्यांदा विजयाच्या समीप

नागपूर: महाराष्ट्र विधानसभेचा निकाल जाहीर होत आहे. सर्व जनतेचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. राज्यातील अनेक मतदारसंघांपैकी एक भंडारा आहे, ज्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती मानल्या जाणाऱ्या शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर विजयाच्या जवळ आहेत. ते १८ हजारांनी समोर आहेत. काँग्रेसच्या पूजा ठावकर त्यांच्याविरोधात रिंगणात होत्या.

२०१९ मध्ये काय घडले?

भंडारा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत भाजपाकडून अरविंद भालाधरे तर काँग्रेसकडून जयदीव कवाडे यांनी उमेदवारी दिली होती. पण त्यावेळी असे घडले की जेव्हा शिवसेनेचे नेते नरेंद्र भोंडेकर यांनी या जागेवर अपक्ष विजयी झाले होते. यावेळी ते पुन्हा विजयाच्या जवळ आहेत.

15:14 (IST) 23 Nov 2024
महायुतीच्या विजयानंतर अमृता फडणवीस ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाल्या…

देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयानंतर आणि महायुतीने राज्यात दणदणीत विजय मिळवल्यानंतर अमृता फडणवीसांनी पोस्ट केली आहे. ‘या दणदणीत विजयासाठी मला एक शब्द सूचवा’, असं कॅप्शन देत त्यांनी पती देवेंद्र फडणवीसांबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे.

15:06 (IST) 23 Nov 2024

सुनील केदार यांना मोठा धक्का! पत्नीला विजय मिळवून देण्यात अपयशी, भाजप विजयाकडे

नागपूर : काँग्रेसकडून नेते सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार या लढत होत्या. त्यांच्या विजयासाठी केदार यांनी संपूर्ण ताकद लावली होती. मात्र त्यांना यश आले नाही.

सविस्तर वाचा…

14:19 (IST) 23 Nov 2024

Digras Assembly Election Results 2024 : दिग्रस अपडेट

२० व्या फेरीअखेर संजय राठोड २५३३ मतांनी आघाडीवर

14:18 (IST) 23 Nov 2024

Aheri Assembly Election Results 2024 : अहेरी मतदारसंघ अपडेट

१७ वी फेरी

धर्मरावबाबा आत्राम यांना ४०५३६

अमरीशराव आत्राम ३३१९५

भाग्यश्री आत्राम २५६५८

धर्मरावबाबा आत्राम हे ७३४१ मतांनी आघाडीवर

14:04 (IST) 23 Nov 2024
Digras Assembly Election Results : दिग्रस मतदारसंघात २० वी फेरीअखेर संजय राठोड २५३३ मतांनी आघाडीवर

मतदारसंघ : दिग्रस

२० वी फेरी

उमेदवाराचे नाव – मिळालेली मते

१) संजय राठोड – ५८३१

२) माणिकराव ठाकरे – ३२९८

२० वी फेरीअखेर संजय राठोड २५३३ मतांनी आघाडीवर

14:03 (IST) 23 Nov 2024

उत्तर नागपूर मतदारसंघात नितीन राऊत १५ हजार ९८७ मतांनी आघाडीवर

Akola East Assembly Election Results : अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपचे रणधीर सावरकर ५०६१३ मतांनी विजयी

अकोल्यात ठाकरे गटाचे जहाज वंचितने बुडवले

विधानसभा निवडणूक २०२४

अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ

अकोला लोकसत्ता अपडेट

सर्व फेरी अखेर

रणधीर सावरकर (भाजप, महायुती) – १०८६१९

गोपाल दातकर (शिवसेना युबीटी, मविआ) – ५८००६

ज्ञानेश्वर सुलताने (वंचित) – ५०६८१

भाजपचे रणधीर सावरकर ५०६१३ मतांनी विजयी

14:01 (IST) 23 Nov 2024
Ramtek Assembly Election Results : रामटेक मतदारसंघ, जाणून घ्या निकाल

रामटेक –

१३ वी फेरी

आशिष जयस्वाल – ७५४७५

राजेंद्र मुळक – ६०७२४

चंद्रपाल चौकसे- २७४७

विशाल बरबटे – ३४०२

14:00 (IST) 23 Nov 2024
West Nagpur Assembly Election Results : पश्चिम नागपूर मतदारसंघात १६ व्या फेरीअखेर काँग्रेसचे विकास ठाकरे १३७५ मतांनी पुढे

पश्चिम नागपूर मतदारसंघ

१६ वी फेरी अखेर

काँग्रेसचे विकास ठाकरे १३७५ मतांनी पुढे

ठाकरे- ४६१५

भाजपचे कोहळे- ३९८०

13:45 (IST) 23 Nov 2024
Akola West Assembly Election Results : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात सोळाव्या फेरीअखेर काँग्रेस उमेदवार १३७३६ मतांनी आघाडीवर

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ

सोळाव्या फेरी अखेर

विजय अग्रवाल (भाजप, महायुती) – ६३२६७

साजिद खान पठाण (काँग्रेस, मविआ) – ७७००३

हरीश आलिमचंदानी (वंचित समर्थित अपक्ष) – १४२८९

काँग्रेस १३७३६ मतांनी आघाडीवर

13:44 (IST) 23 Nov 2024

दक्षिण नागपूर मतदारसंघात भाजपचे मोहन मते एकूण ३३३४ मतांनी आघाडीवर

दक्षिण नागपूर मतदारसंघ

भाजपचे मोहन मते एकूण ३३३४ मतांनी आघाडीवर.

गिरीश पांडव ५५३३

मोहन मते २७४१

अंतर २७९२

13:43 (IST) 23 Nov 2024
Umred Assembly Election Results : उमरेड मतदारसंघात १७ व्या फेरीअंत काँग्रेसचे संजय मेश्राम हे ९७०१ मतांनी आघाडीवर आहेत

उमरेड मतदारसंघ

१७ वी फेरी अंती काँग्रेस संजय मेश्राम ७१३५०, भाजप सुधीर पारवे ६१६४९, प्रमोद घरडे ४२८९६, संजय मेश्राम काँग्रेस हे ९७०१ मतांनी आघाडीवर आहेत.

13:41 (IST) 23 Nov 2024

आर्णी – केळापूर विधानसभा मतदारसंघात १३ व्या फेरीपर्यंत भाजपाचे राजू तोडसाम ११७५२ मतांनी आघाडीवर

आर्णी – केळापूर विधानसभा मतदारसंघ

१३ फेरीपर्यंत

भाजपाचे राजू तोडसाम ११७५२ मतांनी आघाडीवर

—-

भाजपचे राजू तोडसाम – ६२८००

काँग्रेसचे जितेंद्र मोघे – ५१०४८

13:39 (IST) 23 Nov 2024

फडणवीस पहिल्या फेरीपासून आघाडीवर, कार्यकर्त्यांचा जल्लोष

नागपूर: संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या नागपूरमधील दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात भाजप नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या मतदारसंघात चोथ्यांदा विजयी होण्याच्या उंबरठ्यावर आहे. पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेल्या फडणवीस यांनी बाराव्या फेरी अखेर १८ हजार मतांनी आघाडी घेतली. बाराव्या फेरीसह देवेंद्र फडणवीस यांना ५३८६० मते, कॉंग्रेसचे प्रफुल्ल गुडधे यांना ३५९५४ मते मिळाली.

इतर उमेदवारांना पुढील प्रमाणे मते मिळाली.

सुरेंद्र डोंगरे १२८५ मते ,उषा ढोक ५६ मते, ओपुल तागगाडगे २६४, पंकज शंभरकर ३०, विनय भांगे मते १२२२, विनायक अवचट २७ मते, नितीन गायकवाड २१ मते, मेहमूद खान १८, विनोद मेश्राम ३६, सचिन वाघाडे १०५, नोटा ८२० मते

13:26 (IST) 23 Nov 2024

हिंगणघाट मतदारसंघात भाजपचे समीर कुणावार यांना २० हजारांचे मताधिक्य

हिंगणघाट

भाजपचे समीर कुणावार यांना २० हजारांचे मताधिक्य

13:25 (IST) 23 Nov 2024
Akola East Assembly Election Results : अकोला पूर्व मतदारसंघात सविसाव्या फेरीअखेर भाजप उमेदवार ५०३११ मतांनी आघाडीवर

विधानसभा निवडणूक २०२४

अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ

अकोला लोकसत्ता अपडेट

सविसाव्या फेरी अखेर

रणधीर सावरकर (भाजप, महायुती) – १०७२६७

गोपाल दातकर (शिवसेना युबीटी, मविआ) – ५६९५६

ज्ञानेश्वर सुलताने (वंचित) – ५०१६०

भाजप ५०३११ मतांनी आघाडीवर

विदर्भ विधानसभा निवडणूक २०२४ लाईव्ह निकाल अपडेट्स