देशात पाच राज्यांच्या निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. तेलंगणातही स्थानिक, सत्ताधारी पक्ष जनसभा घेऊन जनतेशी संवाद साधत आहेत. अशातच एक दुर्घटना घडली. गाडीवरील रेलिंग तुटल्याने भारत राष्ट्र समिती पक्षाचे मंत्री केटीआर आणि इतर काही मंत्री खाली पडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तेलंगणाच्या निझामाबाद जिल्ह्यातील अरमूर येथे बीआरएसचा प्रचार सुरू होता. यादरम्यान, एका गाडीच्या छताच्या रेलिंगमध्ये पक्षाचे काही नेते आणि तेलंगणाचे नेते केटीआरही उभे होते. दोन्ही बाजूला तुफान गर्दी होती. त्यामुळे प्रत्येकाला हात उंचावून जनाशिर्वाद मागण्यात व्यस्त असलेले नेते अचानक खाली कोसळले. वाहनाच्या चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने रेलिंग तुटली परिणामी छतावर असलेले नेते खाली पडले.

रेलिंग तुटून मंत्री खाली पडताच आजूबाजूला असलेल्या लोकांनी त्यांना सावरलं, त्यामुळे फारशी दुखापत झाली नाही. मला दुखापत झाली नसून मी सुखरूप आहे, अशी प्रतिक्रियाही केटीआर यांनी दिली.

दरम्यान, आता हा व्हिडीओ व्हायरल सोशल मीडियावर झाला आहे. तर, अनेक नेटिझन्सने यावर तुफान प्रतिक्रियाही दिल्या आहेत. पुढील काही वर्षांसाठी मिम मटेरिअल मिळाल्याचं काहीजण म्हणत आहेत, तर काहींनी त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली आहे. तेलंगणात ३० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. बीआरएस, काँग्रेस आणि भाजपा अशी तिहेरी लढत येथे होत आहे.