कल्याण – कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे खास समर्थक, शिंदे शिवसेनेचे निष्ठावान शिवसैनिक, शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी सोमवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. यावेळी शिंदे शिवसेनेतील एकही पदाधिकारी, नेता उपस्थित नव्हता. त्यामुळे महेश गायकवाड यांची लढत ही एकाकी लढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कल्याण पूर्वेत महायुतीच्या उमेदवार म्हणून सुलभा गायकवाड यांची उमेदवारी महायुतीच्या उमेदवार म्हणून जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पूर्व भागातील सर्व इच्छुक उमेदवार, पदाधिकाऱ्यांना आपणास महायुती धर्माचे पालन करून महायुतीच्या उमेदवार सुलभा गायकवाड यांचा प्रचार करायचा आहे. त्यामुळे कोणीही बंडखोरीच्या भूमिकेत जाऊ नये, असे सूचित केले होते.

Deputy Chief Minister Ajit Pawar, NCP, Harshvardhan Patil, Indapur
हर्षवर्धन पाटील हे दलबदलू, उपमुख्यमंत्री अजित पवार यांंची टीका
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
ncp ajit pawar announce mauli katke name as a Candidate from shirur constituency
‘शिरूर’ची जागा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडे; माऊली कटके यांची उमेदवारी जाहीर
Pratap Chikhalikar, Pratap Chikhalikar latest news,
प्रताप चिखलीकरांचे पाचवे पक्षांतर !
Ajit Pawar NCP
Ajit Pawar NCP : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत एका तासात चार मोठे पक्षप्रवेश अन् उमेदवाऱ्याही जाहीर; ‘मविआ’तील तिन्ही पक्षांना अप्रत्यक्ष इशारा?
Manohar chandrikapure
अजित पवारांच्या नाराज आमदाराची प्रथम काँग्रेसकडे धाव, नंतर प्रहारमध्ये प्रवेश, महायुतीमध्ये बंडाचा झेंडा
Mahavikas aghadi, BJP, Congress, Bhiwandi West assembly constituency
भिवंडी पश्चिमेत मत विभाजन टाळण्याचे मविआपुढे आव्हान
assembly election applications opening candidates rushed to submit their nominations on Monday
माहीम मध्ये कोणाविरुद्ध कोण? अनिश्चित्ता!

मागील दोन वर्षापासून कल्याण पूर्व भागाचा भावी आमदार म्हणून महेश गायकवाड यांनी काम सुरू केले होते. विकास कामांबरोबर नागरी समस्या मार्गी लावण्यात ते पुढाकार घेत होते. आपल्या प्रस्थापित आमदारकीसह उमेदवारीला महेश गायकवाड हे उभरते नेतृत्व आव्हान देत आहे, म्हणून आमदार गणपत गायकवाड यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली होती. या अस्वस्थेमधून गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यात धुसफूस सुरू झाली होती.

हेही वाचा >>> भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते कल्याणमधील नाराजांची समजूत काढण्यास अपयशी; नरेंद्र पवार, महेश गायकवाड यांचे उमेदवारी अर्ज दाखल

ही अवस्था आणि एका जमीन वादाच्या प्रकरणातून आमदार गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. दोघांमधील वाद अधिक चिघळला. गोळीबार प्रकरणामुळे आमदार गणपत गायकवाड तुरूंगात आहेत. पूर्व भागातील उमेदवारी आपणास मिळेल अशी गणिते महेश गायकवाड यांनी केली होती. तशा प्रकारचे जनसंघटन त्यांनी केले होते.

भाजपने घाईने कल्याण पूर्वेची उमेदवारी जाहीर केली. आमदार गणपत गायकवाड यांच्या घरात सुलभा गायकवाड यांना ही उमेदवारी मिळाल्याने महेश गायकवाड अस्वस्थ झाले. त्यांनी आपण पूर्व भागातील भाजप उमेदवाराचा प्रचार करू, पण आमदार गणपत गायकवाड यांच्या घरात उमेदवारी दिल्यास काम करणार नाही अशी भूमिका घेतली. अखेर महेश गायकवाड यांनी एकला चलो रे पध्दतीने सोमवारी शक्तिप्रदर्शन करत कल्याण पूर्वेचा विकास हे ध्येय समोर ठेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला.

हेही वाचा >>> भाजपचे नेते उमेदवारीसाठी शिंदे सेनेत

महेश यांना महायुती, शिवसेनेची साथ नसली तरी नाराज शिवसैनिक किती साथ देतात यावर त्यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

कोट पंधरा वर्ष कल्याण पूर्वेचे शोषण झाले. सामान्य लोकांना आता विकास पाहिजे म्हणून त्यांच्या मागणीप्रमाणे आपण ही निवडणूक लढवित आहोत. ठाकरे गटाच्या यापूर्वीच्या उमेदवाराला आताच्या महायुतीच्या उमेदवाराने मदत केली होती. त्यामुळे बंडखोरीची भाषाला आम्हाली कोणी शिकवू नये.

महेश गायकवाड, शहरप्रमुख,

शिंदे शिवसेना. महेश गायकवाड यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मिरवणुकीत शिवसेनेच्या कोणीही कार्यकर्ता, पदाधिकाऱ्यांनी सामील होऊ नये. महायुतीचा धर्म सर्वांनी पाळायचा आहे. जे या मिरवणुकीत सहभागी झाल्याचे दिसतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. गोपाळ लांडगे, जिल्हाप्रमुख, शिंदे शिवसेना.