उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत अशी ख्याती असलेल्या खासदार ओम राजेनिंबाळकर यांना त्यांच्या घरातूनच धक्का बसला आहे. त्यांचे चुलत बंधू तथा धाराशिवचे माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी बंडाचे निशाण हाती घेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे ठाकरे सेनेला पहिल्याच घासाला खडा लागल्याची चर्चा सध्या धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघात सुरू आहे. निष्ठावंत शिवसैनिक हे बिरुद घेऊन दुसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असलेल्या आमदार कैलास पाटील यांनी सोमवारी शक्ती प्रदर्शन केले. आणि त्याचवेळी मकरंद राजेनिंबाळकर यांच्या अपक्ष उमेदवाराची वार्ता येऊन धडकली. उमेदवारीवरून निर्माण झालेला हा संघर्ष आटोक्यात आणण्यासाठी खासदार राजेनिंबाळकर काय उपाय शोधतात? याकडे ठाकरे सेनेतील हताश पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या नजारा लागल्या आहे.
हेही वाचा >>> Yavatmal Vidhan Sabha Constituency: यवतमाळात महाविकास आघाडीत बंडाचे निशाण; माजी आमदार संदीप बाजोरीया यांनी भरला उमदेवारी अर्ज
लोकसभा निवडणुकीमध्ये एकमेकांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्यात दुरंगी लढत झाली. मोठ्या मताधिक्क्याने राजेनिंबाळकर यशस्वी झाले. धाराशिव शहरात खासदार राजेनिंबाळकर यांना 16 हजाराहून अधिक मतांची आघाडी लाभली. यात माजी नगराध्यक्ष तथा खासदार राजेनिंबाळकर यांचे चुलत बंधू मकरंद राजेनिंबाळकर यांचेही योगदान मोठे आहे. मागील विधानसभा निवडणुकीवेळी मकरंद राजेनिंबाळकर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून इच्छुक होते. ऐनवेळी तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य तथा ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख असलेले कैलास पाटील यांच्या गळ्यात ओम राजेनिंबाळकर यांच्या पुढाकारामुळे उमेदवारीची माळ पडली. त्याच वेळी मकरंद राजेनिंबाळकर नाराज असल्याची चर्चा सर्वत्र पसरली होती. मात्र माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी त्यावेळी माघार घेतली. आणि कैलास पाटील पहिल्यांदा विधानसभा सदस्य म्हणून कळंब-उस्मानाबाद मतदारसंघातून विजयी झाले.
हेही वाचा >>> Video : अनाथ व निराधार वृद्धांसाठी मदतीचा हात…; ‘ठरलं तर मग’ जुई गडकरीच्या ‘त्या’ कृतीचं सर्वत्र होतंय कौतुक
गुहाटी मार्गे सत्तेचा जो नवा प्रयोग महाराष्ट्रात घडला, त्यावेळी गुजरातच्या सीमेवरून परतुन आलेल्या कैलास पाटील यांच्या नावाची चर्चा सगळीकडे सुरू झाली. आणि निष्ठावंत नावाचे विशेषण त्यांना येऊन चिकटले. त्यामुळे पुन्हा एकदा उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघातून ठाकरे सेनेचे शिलेदार म्हणून कैलास पाटील हेच उमेदवार असतील यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले होते. दरम्यान तुळजापूर विधानसभा मतदारसंघ ठाकरे सेनेला मिळावा यासाठी मोठे प्रयत्न सुरू झाले. तुळजापूरमधून भाजपाचे विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना आव्हान देण्यासाठी पारंपारिक प्रतिस्पर्धी म्हणून मकरंद राजेनिंबाळकर यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली. तुळजापूर विधानसभा मतदारसंघ आघाडीमध्ये काँग्रेसकडेच राहिला. त्यामुळे विधानसभा निवडणूक लढवू इच्छित असलेल्या मकरंद राजेनिंबाळकर यांच्यासमोर अन्य कोणताही मार्ग उरला नाही. त्यामुळे त्यांनी बंडाचे निशाण हातात घेतले असल्याची चर्चा आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज विकत घेतला असून ठाकरे सेनेच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल केल्यास ठाकरे सेनेला घरातीलच हे आव्हान पेलण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आपण ही निवडणुक लढविण्याचे ठरविले असल्याचे मकरंद राजेनिंबाळकर यांनी सांगितले आहे. त्यांचा हा निर्णय खासदार राजे आणि आमदार कैलास पाटील यांना मोठा धक्का देणारा आहे. राजकारणात जाईंट किलर म्हणुन ख्याती असलेल्या मकरंद राजेनिंबाळकर यांचा धाराशिव, कळंब या दोन्ही शहरासह ग्रामीण भागातही चांगला जनसंपर्क आहे. मकरंद राजे यांची मनधरणी करण्यासाठी ठाकरे सेनेचे खासदार व आमदार नेमका कोणता पवित्रा घेणार याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख असलेले मकरंद राजे मंगळवारी आपली उमेदवारी दाखल करणार आहेत. त्यामुळे शिवसेना महाविकास आघाडीच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढणार आहे. मकरंद राजेनिंबाळकर महाविकास आघाडीतील नाराज असलेले अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी मकरंद राजे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. उस्मानाबाद-कळंब हा ठाकरे सेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. त्याच ठिकाणी ठाकरे यांच्या पक्षात बंडखोरी झाल्यास उमेदवार कैलास पाटील यांच्या दुसऱ्यांदा विधानसभेत जाण्याच्या स्वप्नावर पाणी फिरू शकते.