2024 Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll Updatesमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान आज एकाच टप्प्यात पार पडलं. मतदान झाल्यानंतर लागलीच नेहमीप्रमाणे एग्झिट पोल अर्थात मतदानोत्तर चाचण्यांचे कल येऊ लागले. यामध्ये पक्षनिहाय आणि आघाडीनिहाय कल समोर आले. लोकसभा निकालांचे पडसाद विधानसभा निवडणुकांवर पडतील, असे अंदाज वर्तवले जात होते. पण एग्झिट पोलमध्ये मात्र चित्र वेगळंच दिसून येत आहे. बहुतेक सर्वच एग्झिट पोलमध्ये महायुतीला राज्यात सरकार स्थापन करण्याइतकं संख्याबळ मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पण एग्झिट पोलचे हे अंदाज खरे ठरतील? कारण लोकसभेवेळी चित्र बरोबर उलटं झालं होतं!

काय आहेत एग्झिट पोलचे अंदाज?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीचे एग्झिट पोलचे अंदाज समोर आले असून त्यात महायुतीला बहुमत मिळेल असं नमूद करण्यात आलं आहे. एकूण १० पैकी सहा एग्झिट पोल्सनं महायुतीलाच बहुमत मिळेल असा कौल दिला आहे. यामध्ये पी-मार्क, पीपल्स पल्स, मॅट्रिझ, चाणक्य, लोकशाही मराठी रुद्र अशा काही एग्झिट पोल्सचा समावेश आहे.

देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं? बावनकुळे म्हणाले... (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Ravindra Waikar And Amol Kirtikar
Ravindra Waikar : रवींद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला निर्णय
महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का?
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra News : मंत्रिमंडळ विस्तारासाठी हालचालींना वेग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तातडीने दिल्ली दौऱ्यावर
Maharashtra Breaking News Updates
Maharashtra News : “राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ‘इंडिया’ निवडणुका जिंकत नसल्याचा शरद पवारांकडून ठपका”, उदय सामंतांचं वक्तव्य
mahayuti government,
लेख : नव्या विधानसभेकडून दहा ठोस अपेक्षा
Sudhir Mungantiwar On Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? महत्त्वाची माहिती समोर

आघाडीनिहाय एग्झिट पोलचे अंदाज

पोलमहायुतीमविआइतर
P-MARQ१३७ – १५११२६ ते १४६२ ते ८
People’s Pulse१७५ ते १९५८५ ते ११२७ ते १२
Matrize१५० ते १७०११० ते १३०८ ते १०
Lokshahi-Marathi Rudra१२८ ते १४२१२५ ते १४०१८ ते २३
JVC१०५ ते १२६६८ ते ९१८ ते १२
Chanakya१५२ ते १६०१३० ते १३८६ ते ८
Dainik Bhaskar१२५ ते १४०१३५ ते १५०२० ते २५
Electoral Edge११८१५०२०
Poll Diary१२२ ते १८६६९ ते १२११० ते २७

या एग्झिट पोल्समुळे सत्ताधाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी महाराष्ट्रात एग्झिट पोलचे अंदाज बरोबर उलटे झाल्याचं नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यानं पाहिलं आहे. त्यामुळे हे एग्झिट पोलदेखील फिरणार की सत्ताधाऱ्यांना कौल मिळणार? याची आता उत्सुकता निर्माण झाली आहे.

लोकसभेवेळी काय होते एग्झिट पोलचे अंदाज?

पोलमहायुतीमविआइतर
इंडिया न्यूज डी डायनॅमिक्स३४१३
न्यूज २४ चाणक्य३३१५
रिपब्लिक भारत-मॅट्रीझ३० ते ३५१३ ते १९
रिपब्लिक PMARQ२९१९
टीव्ही ९ पोलस्ट्राट२२२६
एबीपी-सी व्होटर२४२३

लोकसभा निवडणुकीवेळी देशाप्रमाणेच महाराष्ट्रातही महायुतीला मोठं यश मिळेल, असाच अंदाज बहुसंख्य एग्झिट पोल्सनं दिला होता. त्यात इंडिया न्यूज, न्यूज २४ चाणक्य, रिपब्लिकन भारत-मॅट्रिझ, रिपब्लिक पीएमएआरक्यू अशा एग्झिट पोलचा समावेश होता.

Ajit Pawar NCP vs Sharad Pawar NCP Exit Poll Updates: शरद पवार की अजित पवार? एग्झिट पोलनुसार मतदारांची साथ कुणाला? वाचा सर्व अंदाज!

लोकसभा निवडणुकीचा काय लागला निकाल?

दरम्यान, या एग्झिट पोलच्या बरोबर उलटे निकाल प्रत्यक्षात महाराष्ट्रात लागल्याचं पाहायला मिळालं. महायुतीची थेट १७ जागांवर पीछेहाट झाली, तर महाविकास आघाडीनं ३१ जागांवर यश मिळवलं. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीला बहुमताचा अंदाज वर्तवणारे एग्झिट पोल खरे ठरतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Story img Loader