Vinesh Phogat Julana Constituency Haryana Election Result 2024 : हरियाणा विधानसभेसाठी मतदान पार पडल्यानंतर विविध माध्यमे आणि वृत्तवाहिन्यांनी एग्झिट पोलचे अंदाज जाहीर केले. अनेकांनी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज व्यक्त केला आहे. काँग्रेस बहुमताचा (४६) टप्पा सहज पार करणं शक्य होईल, असंच अनेक एग्झिट पोलमधून दिसून आलं. हरियाणा विधानसभा निवडणूक लक्षवेधी ठरली ती कुस्तीपटू विनेश फोगटमुळं. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक देऊनही पदकापासून वंचित राहावं लागल्यामुळं विनेश फोगट देशभर चर्चेत आली होती. त्याआधी तिने व तिच्या सहकाऱ्यांनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात अनेक महिने दिल्लीत आंदोलन केलं होतं. बृजभूषण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण केल्याचा त्यांच्यावर आरोप केला होता. या आंदोलनामुळेही विनेशची देशभर चर्चा झाली होती.

दरम्यान, विनेशने कुस्तीच्या आखाड्यातून निवृत्ती घेत थेट निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. त्यामुळे तिच्या कामगिरीकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. विनेश फोगट निवडणूक लढवत असलेल्या जुलाना विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी उत्स्फुर्तपणे मतदान केलं आहे. एग्झिट पोलच्या अंदाजानुसार विनेश ही निवडणूक जिंकू शकते. या निवडणुकीचं चित्र आज सायंकाळी स्पष्ट होईल. मात्र सकाळी ११ वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार जुलाना मतदारसंघात अटीतटीची लढाई चालू आहे.

Maharashtra Assembly Elections 2024 will opposition in maharashtra get Leader of opposition post
विरोधी पक्षनेतेपद विरोधकांना मिळू शकते का ?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
one nation one election
मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाची ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी
Ravindra Waikar And Amol Kirtikar
Ravindra Waikar : रवींद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला निर्णय
Mahavikas Aghadi News
विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच?
Chief Minister Devendra Fadnavis criticizes Sharad Pawar over assembly election defeat pune news
‘संयमाने वागून नेत्यांनी पराभव स्वीकारावा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शरद पवारांवर टीका
Sharad Pawar On Rohit Pawar Rohit Patil
Sharad Pawar : रोहित पवारांना डावलून रोहित पाटील यांना प्रतोद का केलं? शरद पवारांनी सांगितलं मोठं कारण
Amol Khatal
Amol Khatal : बाळासाहेब थोरातांना पराभूत करणारा आमदार खास टोपी घालून विधान भवनात; म्हणाले, “ही टोपी…”

हे ही वाचा >> Jammu and Kashmir: बहुमत मिळाले नाही तरी भाजपा बाजी मारणार? नायब राज्यपालांचा अधिकार भाजपाला तारणार

निवडणूक आयोगाने सकाळी ११ वाजता जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार (चौथ्या फेरीनंतर) जुलाना मतदारसंघात भाजपाचे योगेश कुमार हे ३,६४१ मतांनी आघाडीवर आहेत. योगेश कुमार यांना १९,२१८ मतं मिळाली आहेत. तर, विनेश फोगटच्या पारड्यात १५,५७७ मतं पडली आहेत. पाचव्या फेरीत विनेशने योगेश कुमारांची आघाडी कमी केली. ११.१५ वाजता जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार (पाचव्या फेरीनंतर) योगेश कुमार यांना २२,२११ मतं मिळाली आहेत. तर, विनेशला २०,७९४ मतं मिळाली आहेत. योगश कुमार यांच्याकडे १,४१७ मतांची आघाडी आहे.

हे ही वाचा >> Jammu and Kashmir Assembly Election Result 2024 Live : जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसप्रणित ‘इंडिया’ची ५२ आणि भाजपाची २२ जागांवर आघाडी

हरियाणात भाजपाची जोरदार मुसंडी तर काँग्रेस पिछाडीवर, भाजपा ४६ तर काँग्रेसची ३७ जागांवर आघाडी

हरियाणा विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. तर काँग्रेस पिछाडीवर आहे. भाजपा ४६ तर काँग्रेसची ३७ जागांवर आघाडी आहे. त्यामुळे हरियाणातील आकड्यांमध्ये मोठा बदल पाहायला मिळत आहे. काँग्रेस पक्ष ६० पर्यंत गेला होता. मात्र, काँग्रेसचे आकडे आता खाली आले असून हरियाणात काँग्रेसमध्ये धक्का बसण्याची शक्यता आहे. थोड्याच वेळात निकाल स्पष्ट होईल.

Story img Loader