Vinesh Phogat Julana Constituency Haryana Election Result 2024 : हरियाणा विधानसभेसाठी मतदान पार पडल्यानंतर विविध माध्यमे आणि वृत्तवाहिन्यांनी एग्झिट पोलचे अंदाज जाहीर केले. अनेकांनी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज व्यक्त केला आहे. काँग्रेस बहुमताचा (४६) टप्पा सहज पार करणं शक्य होईल, असंच अनेक एग्झिट पोलमधून दिसून आलं. हरियाणा विधानसभा निवडणूक लक्षवेधी ठरली ती कुस्तीपटू विनेश फोगटमुळं. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक देऊनही पदकापासून वंचित राहावं लागल्यामुळं विनेश फोगट देशभर चर्चेत आली होती. त्याआधी तिने व तिच्या सहकाऱ्यांनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात अनेक महिने दिल्लीत आंदोलन केलं होतं. बृजभूषण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण केल्याचा त्यांच्यावर आरोप केला होता. या आंदोलनामुळेही विनेशची देशभर चर्चा झाली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा