Vinesh Phogat Wins From Julana Assembly Election 2024 : महिला मल्ल विनेश फोगटचा हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत विजय झाला आहे. कुस्तीच्या मैदानातून राजकीय आखाड्यात उतरलेली विनेश फोगट आता विधानसभेचं मैदान गाजवणार हेच तिने तिच्या विजयानंतर दाखवून दिलं आहे. कुस्तीपटू आणि विनेशचा सहकारी बजंरग पुनियाने तिच्या विजयची पोस्ट केली आहे.

बजरंग पुनियाची पोस्ट काय?

देश की बेटी, विनेश फोगट को बहुत बधाई! अशी ओळ बजरंग पुनियाने लिहिली आहे. तसंच बजरंग पुनियाने म्हटलं आहे की ही लढाई म्हणाजे जुलानाच्या एका जागेसाठी झालेली लढाई नाही किंवा फक्त पक्षांशी, उमेदवारांशी नव्हती. ही लढाई देशात दडपशाही आणणाऱ्यांच्या विरोधात होती. या आशयाची पोस्ट बजरंग पुनियाने केली आहे.

Barsu oil refinery project
बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन महायुतीत जुंपली
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
D Gukesh How Much Prize Money Did Indian Grandmaster Win After Winning World Chess Championship
D Gukesh Prize Money: करोडपती झाला विश्विविजेता गुकेश, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर किती मिळाली बक्षिसाची रक्कम?
Solapur jowar crops loksatta news
सोलापूर : ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीचा पेरा निम्म्यावर, लांबलेल्या पावसाचा परिणाम
Ravindra Waikar And Amol Kirtikar
Ravindra Waikar : रवींद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला निर्णय
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
world chess championship loksatta
गुकेशच्या नवचैतन्याची कसोटी!
Ratnagiri assembly defeat , Shivsena Thackeray Ratnagiri , Ratnagiri latest news, Ratnagiri shivsena news,
रत्नागिरी विधानसभेचा पराभवाचा वाद देवाच्या दारात, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गद्दारांना शिक्षा देण्यासाठी घातले गाऱ्हाणे

विनेश फोगटची संपत्ती किती?

राष्ट्रकुल स्पर्धेत अनेकवेळा सुवर्णपदक जिंकणाऱ्या विनेश फोगटने आपल्या प्रतिज्ञापत्रात तीन चारचाकी वाहने असल्याचे नमूद केले आहे. तसेच एका वाहनासाठी कर्ज काढले असून ते अद्याप भरायचे असल्याचेही सांगितले आहे. विनेशकडे ३५ लाख रुपयांची व्होल्वो एक्ससी ६०, १२ लाखांची ह्युडांइ क्रेटा आणि १७ लाखांची टोयोटा इनोव्हा अशा तीन गाड्या आहेत. इनोव्हा गाडी घेताना १३ लाखांचे कर्ज काढले असून ते अद्याप भरायचे असल्याचे म्हटले आहे.

जनतेला उद्देशून काय म्हणाली होती विनेश फोगट?

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मिरवणूक काढून काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला होता. या मिरवणुकीत भाषण करत असताना विनेश फोगट म्हणाली होती, “खेळाच्या मैदानात तुम्ही सर्वांनी मला नेहमीच पाठिंबा दिला. आता मी एका नव्या क्षेत्रात प्रवेश करत आहे. मी विधानसभेत मी जनतेचा आवाज बनण्याचा प्रयत्न करेन. महिला, वृद्ध, मातांना मी आश्वासन देऊ इच्छिते की तुम्ही आता चिंता करू नका, तुमची मुलगी येत आहे.” तिने हे आश्वासन दिलं होतं त्याप्रमाणे ती जिंकली आहे.

Story img Loader