गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीतर्फे छत्रपती संभाजीनगरसाठी उमेदवार जाहीर करण्यात आलेला नव्हता. अखेर शिवसेना शिंदे गटाने संदीपान भुमरे यांच्या नावाची घोषणा केली. आता शिवसेना उबाठा गटाचे चंद्रकांत खैरे आणि शिंदे गटाचे भुमरे यांचा थेट सामना होणार आहे. मात्र शिंदे गटाकडून उमेदवारी मिळेल, या आशेवर असलेल्या विनोद पाटील यांचा मात्र भ्रमनिरास झाला आहे. काल उमेदवारी झाल्यानंतर आज विनोद पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली. विनोद पाटील निवडणूक लढविणार असल्यामुळे याचा फटका कुणाला बसणार? याची चर्चा होत आहे.

मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाई लढल्यामुळे विनोद पाटील चर्चेत आले होते. सातत्यान कायदेशीर लढाई लढत आल्यामुळे मराठा समाजात त्यांना माननारा एक मोठा वर्ग आहे. आजवर कोणत्याही राजकीय पक्षात विनोद पाटील यांनी प्रवेश केलेला नसला तरी त्यांचे संबंध सर्वपक्षीय राहिलेले आहेत.

Eknath Shinde, Sangola, Shahajibapu Patil,
शहाजीबापू पाटील आमच्या टीमचे ‘धोनी’! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले कौतुक
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Oppositions stole promises along with schemes criticized Eknath Shinde in Ambernath
“विरोधकांनी योजनांसह वचननामाही चोरला…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अंबरनाथमध्ये टीका
airoli vidhan sabha marathi news
ऐरोलीतील बंडोबांना शिंदे सेनेचे अभय ?
brigadier Sudhir sawant
शिवसेना (शिंदे गट) नेते माजी खासदार ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांनी बांधले शिवबंधन
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
Eknath Shinde, Eknath Shinde comment on Mahavikas Aghadi, Mehkar,
मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, “धनुष्य चोरायला ते काही खेळणं आहे का? लाडक्या बहिणींना एकविसशे रुपये…”

आज विनोद पाटील यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून आपली भूमिका व्यक्त केली. ते म्हणाले, “छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार घोषित झाल्याचे मला समजले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मलाच उमेदवारी देण्याची इच्छा होती. मात्र त्यांच्या पक्षातील दोन आमदार आणि राज्यसभेच्या एका खासदाराने विरोध केला. मला विरोध का केला? हे त्यांनाच माहीत.”

औरंगाबादमधून भुमरे यांना उमेदवारी; भाजपचे डॉ. कराड यांच्या मेहनतीवर पाणी

“आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत असतात छत्रपती संभाजीनगरच्या जनतेने विकासासाठी मी निवडणूक लढवावी, अशी सूचना केली होती. त्यामुळे लोकसभा निवडणूक लढवण्यावर मी ठाम आहे. मी पुन्हा एकदा जनतेत जाईल, सर्वांशी चर्चा करेल. जो निर्णय होईल, तो आपल्यासमोर मांडेल. पण हे मी पुन्हा सांगतो छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीच्या विजयाचे गणीत माझ्याकडे आहे”, असे सूचक विधान विनोद पाटील यांनी केले.