Vinod Tawade : महायुतीचा विजय दृष्टीक्षेपात येताच विनोद तावडेंची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले, “हिंदुत्त्वाच्या मूळ प्रवाहात…”
महाराष्ट्रात भाजपा १२६ जागांवर, शिवसेना (एकनाथ शिंदे) ५५, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) ३९, काँग्रेस २१ आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाला १८ जागांवर आघाडी घेतली आहे.
Vinod Tawade on Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात चुरशीची ठरलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने धडाकेबाज आघाडी घेतली आहे. जवळपास २२० पेक्षाही जागा महायुतीच्या वाट्याला येण्याची शक्यता असून भाजपानेही एकहाती १२५ हून अधिक जागांवर आघाडी केली आहे. त्यामुळे येत्या काही तासांत महाराष्ट्रातील चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, विजयाच्या दिशेने धावणाऱ्या भाजपाच्या नेत्यांकडून आता आनंद व्यक्त केला जात आहे. भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनीही महायुतीच्या एकहाती विजयावर प्रतिक्रिया दिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
विनोद तावडे म्हणाले, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर जनतेचा विश्वास बसला आहे. भाजपा-शिवेसना नैसर्गिक युती होती. ही युती उद्धव ठाकरेंनी २०१९ ला तोडली. त्याचा राग बाळासाहेबांच्या मतदारांच्या मनात होता.”
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षावर टीका करताना विनोद तावडे यांनी संजय राऊतांवरही निशाणा साधला. ते म्हणाले, “रोज सकाळी महाराष्ट्राचं वातावरण कलुषित करणारं वक्तव्य भांडूपवरून यायचं. एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांच्या हिंदुत्त्वाचं धनुष्यबाण, आणि हिंदुत्त्वाचं शिवसेना नाव हिंदुत्त्वाच्या मूळ प्रवाहात असलेल्या भाजपाबरोबर आणलं.”
c
महाराष्ट्रात भाजपा १२६ जागांवर, शिवसेना (एकनाथ शिंदे) ५५, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) ३९, काँग्रेस २१ आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाला १८ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे महायुतीला बहुमत स्पष्ट झालं आहे. निकाल सायंकाळपर्यंत स्पष्ट झाल्यानंतर महायुतीच्या एकूण जागांची आकडेवारी येईल.
विनोद तावडेंकडून १०० कोटींचा बननामीचा दावा
दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांच्याविरोधात बदनामीबद्दल १०० कोटी रुपयांचा दावा ठोकण्याची कायदेशीर नोटीस बजावली आहे. विरार येथील विवांता हॉटेलमध्ये तावडे यांच्याकडून कथित पैसेवाटप करण्यात आल्याचे आरोप बहुजन विकास आघाडी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी केले होते. विनोद तावडे हे १९ नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक मतदानाच्या एक दिवस आधी उमेदवार राजन नाईक यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांबरोबर हॉटेलमधील खोलीत चर्चा करीत होते. यावेळी बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते हॉटेलमध्ये शिरले. तावडे यांच्याकडून पैसेवाटप होत असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेस अध्यक्ष खरगे, राहुल गांधी व श्रीनेत यांनीही त्याआधारे तावडे यांच्याकडून पाच कोटी रुपयांचे वाटप सुरू होते, ही रक्कम कोणी व कशी पाठविली, आदी आरोप प्रसिद्धीमाध्यमे व समाजमाध्यमावरून केली.