Maharashtra Exit Poll 2024 Sangli: महाराष्ट्रातले लोकसभा निवडणुकीचे पाच टप्पे आणि देशातले सात टप्पे संपले आहेत. देशाचं प्रचंड लक्ष लागलं आहे ते आता निकालाच्या दिवसाकडे. ४ जून या दिवशी लोकसभेचा निकाल लागणार आहे. या निकालाआधी आज एक्झिट पोल जाहीर केला जातो आहे. एबीपी सी व्होटर्सने सांगलीच्या जागेबाबत महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे. आपण त्याबाबत जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रात महायुतीला २४ जागा तर महाविकास आघाडीला २३ जागा मिळतील असा अंदाज एबीपी सी व्होटर्सने वर्तवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षाला ९ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. म्हणजेच महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी काँटे की टक्कर दिसणार आहे असं हा सर्व्हे सांगतो आहे. अशात सांगलीत धक्कादायक निकाल लागणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सांगलीत ‘मशाल’ नव्हे विशाल

सांगलीच्या जागेवरून सुरूवातीपासूनच महाविकास आघाडीमध्ये वाद झाल्याचं दिसून आलं. काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी मागच्या पाच वर्षांपासून तयारी सुरू केली असताना महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाने परस्पर ही जागा चंद्रहार पाटलांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर महाविकास आघाडीत बिघाडी होते की काय? याची चर्चा होईपर्यंत हा वाद ताणला आहे. सांगलीच्या काँग्रेस नेत्यांनी सुरुवातीपासूनच शिवसेनेला विरोध केला आणि ही जागा आपल्यालाच मिळावी यासाठी प्रयत्न केले. पण शेवटपर्यंत त्यांना यश आलं नाही आणि विशाल पाटलांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला.

हे पण वाचा- दक्षिणेकडच्या तीन प्रमुख राज्यांमध्ये भाजपासाठी सकारात्मक बातमी? Axix-India Today पोल्सनुसार…

विशाल पाटील जिंकणार असा अंदाज

सांगलीत महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील, महायुतीचे संजयकाका पाटील आणि अपक्ष विशाल पाटील अशी तिरंगी लढत होती. या तिरंगी लढतीत विशाल पाटील मारतील त्यामध्ये आता विशाल पाटील बाजी मारतील असा अंदाज बहुतांश एक्झिट पोलमध्ये अंदाज व्यक्त केला जात आहे.

विशाल पाटील यांनी २२ एप्रिल रोजी काय दावा केला होता?

महाविकास आघाडीच्या विचारांचे मतदान मला मिळेल. ही निवडणूक तिरंगी नाही दुरंगी आहे. सक्षम उमेदवार येऊ नये यासाठी डाव केला. माझे नाव बॅलेटवर खालच्या जागेवर नेलं, मला चिन्ह मिळू नये याचेही प्रयत्न झाले. पण तरीही सांगलीत काँग्रेस पक्षाच्या विचारांचा विशाल पाटील यांचा विजय होईल. आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले. विश्वजित कदम यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. पण त्याला यश आलं नाही. पण ही जागा जिंकणार तर आम्हीच, असा विश्वास विशाल पाटील यांनी व्यक्त केला. आता एबीपी सी व्होटर्सचा सर्व्हेही हेच सांगतो आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vishal patil will win sangli seat said abp sea voters survey scj
Show comments