उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात आज(रविवार) १२ जिल्ह्यांमधील ६१ जागांसाठी मतदान होत आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत एकूण ८.०२ टक्के मतदान झाले आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अजय कुमार शुक्ला यांनी सांगितले की, मतदान सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या टप्प्यात ६१ विधानसभा मतदारसंघात ६९३ उमेदवार रिंगणात आहेत, त्यापैकी ९० महिला आहेत. २.२५ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील, त्यापैकी १.२० कोटी पुरुष, १.०५ कोटी महिला आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात एकूण १४०३० मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली असून, कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावर मतदारांची कमाल संख्या १२५० पर्यंत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व मतदानाच्या ठिकाणी रॅम्प (दिव्यांगांच्या सोयीसाठी), स्वच्छतागृहे आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा सुनिश्चित करण्यात आली आहे.

दरम्यान, बहुजन समाज पक्षाच्या (बीएसपी) प्रमुख मायावती यांनी शनिवारी दावा केला की, ‘हत्ती’ने (बसपाचे निवडणूक चिन्ह) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची झोप उडवली आहे, कारण ते त्यांच्या प्रत्येक भाषणात हत्तीचा उल्लेख करतात. याचबरोबर त्यांनी लोकाना आदित्यनाथ यांना परत मठात पाठवण्याचेही आवाहन केले आहे.

गोरखपूरमध्ये सहाव्या टप्प्यात ३ मार्च रोजी मतदान होणार असून योगी आदित्यनाथ गोरखपूर शहर मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. या टप्प्यात राज्यातील १२ जिल्ह्यांतील ६१ जागांसाठी मतदान होत आहे. या जिल्ह्यांमध्ये श्रावस्ती, बहराइच, गोंडा, बाराबंकी, सुलतानपूर, अयोध्या, प्रतापगड, प्रयागराज, कौशांबी, रायबरेली, अमेठी आणि चित्रकूट यांचा समावेश आहे.