महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली असताना केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीलाही सुरुवात झाली आहे. आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली. या निकालानंतर वायनाडची जनता काँग्रेसवरचा विश्वास कायम ठेवते की नव्या उमेदवाराला संधी देते. वायनाड लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत तीनवेळा निवडणुका झाल्या असून तिन्हीवेळा काँग्रेसने जय मिळवला आहे. वायनाडच्या निमित्ताने काँग्रेसच्या प्रियांका गांधी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यामुळे पक्षासह त्यांचीही वैयक्तिक प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान, प्रियांका गांधी सध्या आघाडीवर आहेत. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळानुसार १ लाख ६५ हजार ४८७ मते मिळाली असून १ लाख ८ हजार ५५८ मतांनी त्या आघाडीवर आहेत. त्यामुळे त्यांचा विजय आता स्पष्ट झाला आहे.

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, १३ नोव्हेंबरला झालेल्या वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाल ६४. २४ टक्के मतदान झाले होते. २००९ च्या पहिल्या मतदानानंतर यंदा सर्वांत कमी मतदान या मतदारसंघात झाले आहे. प्रियांका गांधी यांच्याविरोधात लोकतांत्रिक मोर्चाचे उमेदवार सत्यन मोकेरी आणि राष्ट्रीय जनतांत्रिक आघाडी (NDA)चे उमेदवार नव्या हरिदास यांच्यासह १३ उमेदवार रिंगणात आहेत.

Congress List for delhi assembly Election
Delhi Election : आता दिल्ली विधानसभेची धूम! काँग्रेसने जाहीर केली २१ उमेदवारांची यादी, अरविंद केजरीवालांसमोर तगडा उमेदवार!
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Rahul Gandhi And Arvind Kejriwal.
Delhi Election 2025 : काँग्रेसला हवी ‘आप’ची साथ, ‘हात’ मिळवण्यास केजरीवालांचा नकार
देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं? बावनकुळे म्हणाले... (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं?
Maharashtra Assembly Elections 2024 will opposition in maharashtra get Leader of opposition post
विरोधी पक्षनेतेपद विरोधकांना मिळू शकते का ?
Jitendra awhad daughter Natasha Awhad
Natasha Awhad: “भाजपाला ही निवडणूक जिंकायचीच होती, कारण…”, जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचा खळबळजनक दावा
Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
Ravindra Waikar And Amol Kirtikar
Ravindra Waikar : रवींद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला निर्णय
वायनाडमध्ये कोण आघाडीवर, कोण बिघाडीवर?

हेही वाचा >> Priyanka Gandhi : आधी राहुल गांधी, आता प्रियांका गांधी; काँग्रेससाठी वायनाड कसा झाला बालेकिल्ला?

२००९ व २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेस नेते, केरळ स्टुडंट्स युनियनचे माजी अध्यक्ष एम. आय. शानवास यांनी विजय मिळवला होता. ते वायनाडचे पहिले खासदार ठरले होते. वायनाडचा किल्ला जिंकण्यापूर्वी शानवास यांचा तीन विधानसभा व दोन लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव झाला होता. मात्र, २००९ च्या लोकसभा निवडणुकीत शानवास यांनी कम्युनिस्ट पार्टीचे उमेदवार एम. रहमतुल्लाह यांचा तब्बल दीड लाख मतांनी पराभव केला. शानवास यांनी २०१४ मध्ये पुन्हा एकदा वायनाडची लोकसभा निवडणूक जिंकली.

चार दशकांपासून काँग्रेसचा प्रभाव

मतदारसंघ पुनर्रचना होण्यापूर्वी (१९७७ ते २००४ पर्यंत) आजच्या वायनाडमधील विधानसभेचे मतदारसंघ हे कालिकत, कन्नूर आणि मांजेरी या मतदारसंघांमध्ये विभागलेले होते. १९७७ ते २००४ पर्यंत झालेल्या नऊ लोकसभा निवडणुकांपैकी सहा वेळा काँग्रेसने कालिकतची व कन्नूरची जागा जिंकली होती. मात्र, मंजेरीची जागा काँग्रेसला कधी जिंकता आली नव्हती. तर डाव्या पक्षांनी कालिकतमध्ये एकदा व कन्नूरमध्ये तीन वेळा विजय मिळवला होता. मांजेरीची जागा मुस्लीम लीगने जिंकली होती. याचाच अर्थ मतदारसंघांच्या पुनर्रचनेआधीसुद्धा येथील जनतेवर काँग्रेसचा प्रभाव राहिला आहे.

Story img Loader