महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली असताना केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीलाही सुरुवात झाली आहे. आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली. या निकालानंतर वायनाडची जनता काँग्रेसवरचा विश्वास कायम ठेवते की नव्या उमेदवाराला संधी देते. वायनाड लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत तीनवेळा निवडणुका झाल्या असून तिन्हीवेळा काँग्रेसने जय मिळवला आहे. वायनाडच्या निमित्ताने काँग्रेसच्या प्रियांका गांधी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यामुळे पक्षासह त्यांचीही वैयक्तिक प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान, प्रियांका गांधी सध्या आघाडीवर आहेत. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळानुसार १ लाख ६५ हजार ४८७ मते मिळाली असून १ लाख ८ हजार ५५८ मतांनी त्या आघाडीवर आहेत. त्यामुळे त्यांचा विजय आता स्पष्ट झाला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा