केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी कर्नाटकात भाजपाचं पूर्ण बहुमताने सरकार येईल असा विश्वास यांनी व्यक्त केला आहे. मी काँग्रेस नेत्यांना आव्हान देऊ इच्छितो की तुमच्या सरकारच्या कार्यकाळात राज्य सरकारांना तुम्ही किती पैसे दिलेत? ते सांगा आणि एकदा आमच्या कार्यकाळात राज्यांना आम्ही किती पैसे देत आहोत ते पाहा. एवढंच नाही तर आम्ही राजीव गांधी यांच्यासारखे शब्द फिरवणारे नाही असं म्हणत अमित शाह यांनी ३० वर्षांपूर्वीचा एक किस्सा सांगितला आहे. आज तकच्या कर्नाटक राऊंडटेबट कार्यक्रमात अमित शाह यांनी हे वक्तव्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आम्ही राजीव गांधींसारखे शब्द फिरवणारे नाही

“आम्ही राजीव गांधींसारखे नाही. राजीव गांधी यांनी एअरपोर्टवरच निर्णय घेतला होता आणि म्हटलं होतं की वीरेंद्र पाटील हे उद्यापासून मुख्यमंत्री नसतील. आम्ही असं करणारे नाहीत. जर शेट्टार तिकडे गेल्याने काँग्रेसला असं वाटत असेल की ते जिंकतील तर काँग्रेसला हेदखील मान्य करायला हवं की ते स्वबळावर जिंकू शकत नाहीत. कर्नाटकातून आमची व्होट बँक कुठेही गेलेली नाही” असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.

भाजपा एकसंध असलेला पक्ष आहे

भाजपा ही एकजूट असलेली पार्टी आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्ही कर्नाटकात पूर्ण बहुमताचं सरकार स्थापन करू. जेव्हा पक्ष कठोर निर्णय घेतो तेव्हा काही नेते तो निर्णय स्वीकारू शकत नाहीत आणि पार्टी सोडून जातात असंही अमित शाह यांनी शेट्टार यांना उद्देशून म्हटलं आहे.

पीएफआयच्या मुद्द्यावरही अमित शाह यांनी भाष्य केलं. अमित शाह म्हणाले, “पीएफआयमुळे या ठिकाणी लोकांच्या हत्या होत होत्या. भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या. आम्ही जेव्हा कठोर धोरणाचा अवलंब केला तेव्हा आता सुरक्षित वातावरण निर्माण झालं आहे.” असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे