Strong Room Guidelines for Elections: येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडणार असून २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे. सध्या संपूर्ण राज्यात निवडणूक आयोगाकडून यासाठीची तयारी सुरू झाली आहे. निवडणुकीच्या काळात अनेक गोष्टींची खूप व्यवस्थित काळजी घेतली जाते. त्यामध्ये विशेषतः मतदानानंतर ईव्हीएम ठेवण्यासाठी स्ट्राँग रूमही तयार केल्या जातात. पण, या स्ट्राँग रूम्स म्हणजे नक्की काय आणि ती कशी तयार केली जाते ते या बातमीच्या आपण जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्ट्राँग रूम म्हणजे काय? (What are strong rooms)

मतदानानंतर ज्या ठिकाणी EVM (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) आणि VVPAT (व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल) मशीन सुरक्षित ठेवल्या जातात, त्या जागेला स्ट्राँग रूम म्हणतात. तसेच याला स्ट्राँग रूम म्हणण्यामागचे आणखी एक कारण म्हणजे या रूममध्ये एकदा मशीन आत गेल्यावर त्या खोलीत कोणीही प्रवेश करू शकत नाही. तसेच जेव्हा ही मशीन मतमोजणीसाठी बाहेर काढली जाते तेव्हा सुरक्षा कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणीही या रूममध्ये पुन्हा प्रवेश करीत नाही.

स्ट्राँग रूम कुठे बनवल्या जातात?

स्ट्राँग रूम कुठेही बनवल्या जात नाहीत. त्या फक्त सरकारी इमारतींमध्येच बनवल्या जातात. ज्या सरकारी इमारतीत स्ट्राँग रूम बांधायची आहे, त्या इमारतीची आधीपासूनच निवड करण्यात येते आणि त्यानंतर तिच्या सुरक्षेसाठी पूर्ण व्यवस्था केली जाते. तसेच कोणत्याही पोलीस ठाण्यातही स्ट्राँग रूम बनवली जात नाही. स्ट्राँग रूम निवडण्यासाठी बरेच नियम पाळले जातात.

स्ट्राँग रूमच्या सुरक्षिततेसाठी काय केले जाते?

स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेसाठी जिल्हा अधिकारी व पर्यवेक्षक सातत्याने स्ट्राँग रूमला भेट देतात. स्ट्राँग रूमच्या सुरक्षेसाठी सेंट्रल पॅरा मिलिटरी फोर्स तैनात केली जाते. सेंट्रल पॅरा मिलिटरी फोर्स स्ट्राँग रूमच्या आतील बाजूचे संरक्षण करतात. या रूमच्या बाहेरील सुरक्षेची जबाबदारी राज्य सुरक्षा दलांची आहे. ते हातात बंदूक घेऊन असतात आणि तिसऱ्या ठिकाणी स्थानिक इमारतीभोवती पोलिस तैनात केले जातात. स्ट्राँग रूमची सुरक्षा खूप सतर्क असल्याने ती तोडून खोलीत प्रवेश करणे जवळपास अशक्य आहे. तसेच स्ट्राँग रूम ज्या ठिकाणी असते, तो संपूर्ण परिसर सीसीटीव्हीमध्ये कैद असतो आणि अधिकारी नियंत्रण कक्षात बसून निरीक्षण करतात.

हेही वाचा: Maharashtra Assembly Seats : महाराष्ट्रात विधानसभेच्या किती जागा आहेत? जिल्ह्यानुसार सर्व जागांची यादी एका क्लिकवर वाचा

मतमोजणीच्या दोन तास अगोदर प्रत्येक स्तरावर लक्ष ठेवून स्ट्राँग रूम उघडली जाते आणि त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीच्या ठिकाणी नेली जातात. साधारणत: ज्या ठिकाणी स्ट्राँग रूम बांधली आहे किंवा त्याच्या शेजारीच मतमोजणी केली जाते. तसेच EVM डेटा १५ वर्षांसाठी सुरक्षित ठेवला जातो.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What exactly is the strong room during the election period how is the strong room used sap