लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम आता शिगेला पोहोचला आहे. २० मे रोजी पाचव्या टप्प्याचे मतदान संपन्न होईल. या मतदानाच्या माध्यमातून दक्षिणेतील राज्यांचे मतदान जवळपास पूर्ण होणार असून त्यानंतर उत्तर भारत, पश्चिम बंगाल अशा उर्वरित राज्यांवर लक्ष केंद्रीत केले जाईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एएनआय वृत्तसंस्थेला नुकतीच एक मुलाखत दिली. भाजपाला बहुमताचा आकडा गाठता आला नाही, तर भाजपाकडे प्लॅन बी काय आहे? असा प्रश्न या मुलाखतीमध्ये त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी भाजपाला किती जागा मिळू शकतात? याचे विश्लेषण केले.

भाजपाला २७२ पेक्षा कमी जागा मिळाल्या तर पुढील रणनीती काय असेल? असा प्रश्न विचारल्यानंतर अमित शाह म्हणाले की, आम्हाला तशी कोणतीही शक्यता वाटत नाही. पंतप्रधान मोदी यांच्या योजनांचा लाभ मिळालेला ६० कोटींचा जनाधार आमच्याकडे आहे. या लाभार्थी गटात कोणत्याही एका जाती-धर्माचे, वयोमानाचे लोक नाहीत. या लाभार्थ्यांना नरेंद्र मोदी काय आहेत आणि त्यांच्यासाठी ४०० जागा का जरूरी आहेत, याची कल्पना आहे.

Amit Shah Rally cancle
Amit Shah Rally: अमित शाह यांच्या महाराष्ट्रातील सर्व सभा रद्द; शेवटच्या दिवसांत प्रचार करणार नाहीत, मणिपूरमध्ये परिस्थिती चिघळल्यानंतर निर्णय
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
uddhav thackeray emotional appeal impact to voters
उद्धव यांचे भावनिक आवाहन ठाकरे सेनेला कितपत तारणार? मराठवाड्याकडे विशेष लक्ष?
sana malik
Sana Malik : “नवाब मलिक तुरुंगात असताना पक्षातील लोकांनी…”, सना मलिक यांचा गंभीर आरोप!
amit shah remark on muslim reservation in ghatkopar
मुस्लिमांना आरक्षण मिळू देणार नाही; केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे परखड प्रतिपादन
BJP Manifesto For Election
BJP Manifesto : भाजपाच्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचं आश्वासन , शेतकऱ्यांना कर्जमाफीसह ‘या’ घोषणा
loksatta readers feedback
लोकमानस: धोरणांचा प्रचार झालाच नाही
Pramod Mahajan Death Poonam Mahajan
‘प्रमोद महाजनांच्या हत्येमागे गुप्त हेतू’; पूनम महाजन म्हणाल्या, “आता अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांना…”

आम्हाला प्लॅन बी ची गरजच नाही, कारण आमचा प्लॅ ए यशस्वी होणार आहे, असेही अमित शाह म्हणाले. प्लॅन ए यशस्वी होण्याची जेव्हा ६० टक्केच शक्यता असते, तेव्हाच प्लॅन बीची गरज निर्माण होते. पण मला विश्वास आहे की, मोठ्या बहुमताने पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करतील.

भाजपाकडून उत्तर भारत आणि दक्षिण भारत असा दुजाभाव केल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. यावर बोलताना अमित शाह म्हणाले, “केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये भाजपा हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल. “एखादा नेता राज्याला स्वतंत्र देश म्हणून घोषित करत असेल तर हे आक्षेपार्ह आहे. हा देश कधीच वेगळा होऊ शकत नाही. काँग्रेसचा मोठा नेता देशाच्या विभाजनाबद्दल विधान करतो आणि काँग्रेस पक्ष त्या विधानाचा साधा निषेधही करत नाही किंवा त्यापासून अंतरही राखत नाही. देशातील नागरिकांनी काँग्रेसचा अजेंडा समजून घ्यावा. दक्षिणेतील राज्यात भाजपा हा एकमेव मोठा पक्ष म्हणून समोर येईल.”

म्हणून ४०० हून अधिक जागा हव्या आहेत

अमित शाह पुढे म्हणाले की, देशात राजकीय स्थिरता आणण्यासाठी एनडीएला ४०० हून अधिक जागा हव्या आहेत. तसेच भाजपाकडे याआधीही बहुमत होते, पण आम्ही संविधानाला कधीही हात लावला नाही. भारताच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी, भारताला जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनविणे आणि सामान्य नागरिकांचे कल्याण करण्यासाठी ४०० हून अधिका जागा आम्हाला हव्या आहेत.